Featured News

विनयभंगाच्या गुन्हाप्रकरणी डॉ भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला…
विनयभंगाच्या गुन्हाप्रकरणी डॉ भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला…
जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने जामखेड तालुक्यातील नोटरी अधिकाऱ्यांचा सन्मान*
जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने जामखेड तालुक्यातील नोटरी अधिकाऱ्यांचा सन्मान*
जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नोकरभरतीला ब्रेक!
जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नोकरभरतीला ब्रेक!
स्व. शिवचंद (भाऊ) सुराणा यांच्या जन्म जयंती निमित्त वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन
स्व. शिवचंद (भाऊ) सुराणा यांच्या जन्म जयंती निमित्त वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन

Health

बारामती ॲग्रो लि. जय श्रीराम शुगर हळगाव युनिट तीन तर्फे गाळप हंगामा सांगता समारंभ संपन्न….
बारामती ॲग्रो लि. जय श्रीराम शुगर हळगाव युनिट तीन तर्फे गाळप हंगामा सांगता समारंभ संपन्न….

बारामती ॲग्रो लि. जय श्रीराम शुगर हळगाव युनिट तीन तर्फे गाळप हंगामा सांगता समारंभ संपन्न….

रोहित पवार लढवय्ये आमदार तर विरोधी रडके आमदार – विजयसिंह गोलेकर

जामखेड प्रतिनिधी –

रोहित पवार हे लढवय्ये आमदार आहेत. पहिल्याच आमदारकीच्या टर्म मध्ये ईडी चौकशी लावलेले देशातील पहिले आमदार आहेत. तरीही ते जनतेसाठी लढत आहेत. विधानपरिषदेवर नियुक्ती झालेले दुसरे रडके आमदार आहेत. रोहित पवार हे विकास कामांनी ओळखले जातात. त्यांचा विकास देखवत नाहीत म्हणून विरोधी आमदार विकास कामांना स्थगिती लावण्यात वेळ घालवता आमदार रोहित पवार लढवय्ये तर त्यांना विरोध करणारे रडके आमदार आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी व्यक्त केले..

आज बारामती अँग्रो लि. जय श्रीराम शुगर हाळगाव गाळप सांगता समारंभ झालायावेळी बारामती अँग्रोचे व्हाइस चेअरमन गुळवे आबा, निंबे साहेब, प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, दत्तात्रय वारे, सुधीर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, विठ्ठल चव्हाण, सुरेश भोसले, दिपक पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, जगदाळे,

बाबासाहेब उगले, युवराज उगले, विश्वनाथ राऊत, सुनील उबाळे, ढवळे, निलेश पवार, नारायण जायभाय, संतोष निगुडे, गजानन शिंदे, सुरेश पवार, नरेंद्र जाधव, मदन लेकुरवाळे, कुलकर्णी,परकड, यांच्या सह अनेक मान्यवर व ऊस उत्पादक शेतकरी हजर होते.यावेळी बोलताना विजयसिंह गोलेकर म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी कारखाना घेतला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिला नाही. तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार ही मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.
यावेळी बोलताना बारामती अँग्रोचे व्हाइस चेअरमन गुळवे आबा म्हणाले की, चालू गळित हंगामात जय श्रीराम हळगाव कारखान्याने 3.52 हजार मेट्रिक टन गाळप केले आहे. तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक ठेवला नाही. पुढील वर्षी जास्त गाळप करणार आहोत या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना आहे. सर्वात जास्त ऊस खर्डा गटातून आणला. ऊसाचे अँव्हरेज वाढविण्यासाठी ड्रिप करणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय वारे म्हणाले की हा कारखाना काटा मारणाऱ्या तानाजी सावंत टोळीकडे जाऊ दिला नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना ताब्यात घेतला यामुळे शेतकऱ्यांचा खुपच फायदा झाला आहे. आमदार रोहित पवार यांच्या वर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. अनेक कामे उल्लेखनीय आहे.सध्या मतदारसंघात पाणीटंचाई मुळे आमदार रोहित पवार यांनी मोफत पाण्याचे टँकर सुरू केले होते पण प्रशासनाने ते बंद केले आहेत तेव्हा टँकर बंद करणारांना चप्पलानी मारा असे सांगितले श्रीराम कारखाना कामधेनू आहे. सध्या 2900 भाव दिला आहे तरी यावर शेंडी लावावी असे सांगितले.

यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात म्हणाले की,रोहित पवार यांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो शेतकऱ्यांना वाली मिळाला, अँव्हरेज वाढले पाहिजे या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना झालेला आहे. तालुक्यात कोठेही ऊस शिल्लक नाही यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा.मधुकर राळेभात म्हणाले की, ऊस उत्पादन वाढविण्यासाठी पट्टा पद्धतीने ऊस लागवड करा ऊस उत्पादन वाढले पाहिजे रिकव्हरी नुसार भाव द्यावा घरचा कारखाना आहे. जामखेड तालुक्याचे उत्पादन वाढणार आहे.

विनयभंगाच्या गुन्हाप्रकरणी डॉ भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला…
विनयभंगाच्या गुन्हाप्रकरणी डॉ भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला…
जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने जामखेड तालुक्यातील नोटरी अधिकाऱ्यांचा सन्मान*
जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने जामखेड तालुक्यातील नोटरी अधिकाऱ्यांचा सन्मान*
जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नोकरभरतीला ब्रेक!
जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नोकरभरतीला ब्रेक!

Economy

food processing unit अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी
food processing unit अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

food processing unit  सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच नविन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली आहे.  या योजनेंतर्गत उद्योग उभारण्यासाठी वैयक्तिक व गटासाठी १० लक्ष रुपये अनुदान तर कोणत्याही गट किंवा  कंपनीला सामाईक पायभुत सुविधांच्या (CSC) उभारणीसाठी  प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तित जास्त ३ कोटी पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १७५ लाभर्थ्यांना ५ कोटी रुपये कर्ज मंजुर करण्यात आले असुन काही उद्योगही उत्तम प्रकारे सुरु झाले आहेत.

वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी, यांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानाचा  लाभ देण्यात येतो.

सुक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगाना लाभ (सामाईक पायाभुत सुविधा)

शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

मार्केटींग व ब्रॅंडिंग यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात आलेली आहे.

बीज भांडवलग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी खरेदी करण्यासाठी व खेड ते भांडवल म्हणून प्रत्येक सदस्य कमाल चाळीस हजार रुपये व स्वयंसहाय्यता गटाला कमाल चार लाख रुपये देण्यात येते.

काय आहे योजनेचा उद्देश?

अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पतमर्यादा वाढवून उत्पादनांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, सामाईक प्रक्रियासुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्मउद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे हेप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न  प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश आहे.

कोठे संपर्क करावा

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठीइच्छुकांनी केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयांशी संपर्क साधता येईल.

कोणते अन्नप्रक्रिया उद्योग

दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप,

लस्सी.

■ मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला,मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.

■ पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सिताफळ, पेरु, सफरचंद, आवळा,मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासून प्रक्रिया उद्योग, जाम, जेली,

आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट

प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रॅंडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.

■ तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व

प्रकारची तेल उत्पादने.

■ पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स,

ज्वारी, गहू, मिरची, धना, जिरे, गूळ, हळद.

■ पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य

इत्यादी.

■ कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे

इत्यादी.

■ राईस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.

■ बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट,नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चुरमुरे.

राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघातातील जखमींचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघातातील जखमींचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन

Latest News

बारामती ॲग्रो लि. जय श्रीराम शुगर हळगाव युनिट तीन तर्फे गाळप हंगामा सांगता समारंभ संपन्न….

बारामती ॲग्रो लि. जय श्रीराम शुगर हळगाव युनिट तीन तर्फे गाळप हंगामा सांगता समारंभ संपन्न.... रोहित पवार लढवय्ये आमदार तर विरोधी रडके आमदार - विजयसिंह...

विनयभंगाच्या गुन्हाप्रकरणी डॉ भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला…

विनयभंगाच्या गुन्हाप्रकरणी डॉ भास्कर मोरेचा जामिन अर्ज फेटाळला... भास्कर मोरेचा कोठडीत मुक्काम वाढला जामखेड प्रतिनिधी - विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक आसलेल्या डॉ. भास्कर मोरे याचा आज...

जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने जामखेड तालुक्यातील नोटरी अधिकाऱ्यांचा सन्मान*

*जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने जामखेड तालुक्यातील नोटरी अधिकाऱ्यांचा सन्मान* जामखेड प्रतिनिधी, भारत सरकार नोटरी अधिकारी म्हणून जामखेड तालुक्यातील ९ वकिलांची नियुक्ती केली असून त्यामध्ये ॲड.प्रमोद...

जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नोकरभरतीला ब्रेक!

'जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नोकरभरतीला ब्रेक! शिक्षणाधिकार्यांकडून प्रक्रीयेला स्थगिती; धर्मदाय आयुक्तांकडे मागितली संस्थेची कागदपत्रे जामखेड प्रतिनिधी शैक्षणिकदृष्टय़ा अत्यंत नामांकित ठरलेल्या जामखेड तालुक्यातील जामखेड पिपल्स एजुकेशन...

स्व. शिवचंद (भाऊ) सुराणा यांच्या जन्म जयंती निमित्त वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन

स्व. शिवचंद (भाऊ) सुराणा यांच्या जन्म जयंती निमित्त वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन जामखेड प्रतिनिधी, जामखेड शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दानशुर स्वर्गवासी शिवचंद (भाऊ) यांचे नुकतेच...