वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर

आवाज जामखेडचा न्यूज

जिल्हयातील ग्रामीण भागात शौचालय लाभापासून कुठलेही पात्र कुटूंब वंचित राहु नये यासाठी पात्र लाभार्थींना ग्रामपंचायतीकडे अर्ज करण्याची पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत कुटूंब प्रमुखांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील शौचालय अभावी उघडयावर शौचास गेल्याने सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालय बांधकाम करणा-या पात्र कुटूंबांस रुपये 12000/- चे प्रोत्साहन पर बक्षिसाचा लाभ दिला जातो. अशा कुटूंबांसाठी शासनाने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करुन दिली आहे .शासनाच्या निकषानुसार म्हणजेच शौचालय नसलेल्या लाभार्थ्यांपैकी अन्य कुठल्याही योजनेतुन शौचालयासाठी लाभ न घेतलेले कुटूंब प्रमुख यासाठी पात्र ठरु शकतील. प्रोत्साहन पर अनुदानाचा प्रस्तावासोबत अल्पभूधारक, भूमिहीन, महिला कुटूंब प्रमुख, अुनसूचित जाती –जमाती, दिव्यांग कुटूंब प्रमुख, दारिद्रय रेषेखालील कुटूंब असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, लाभार्थ्याचे राष्ट्रीकृत उघडलेल्या खात्याची प्रत, ही आवश्यक कागदपत्रासह परिपुर्ण प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे सादर करावा.
तसेच वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनी मोबाईल कॉम्प्युटर सायबर कॅफे अथवा इतर सामान्य ऑनलाईन सेवेद्वारे SBM-G या संकेतस्थळावरुन अथवा http://sbm.gov.in/sbmphase2/homenew.aspx या लिंकद्वारे Citizen corner किंवा Whats new या ठिकानी जाऊन रजिस्ट्रेशन करावयाचे आहे.

केलेल्या नोंदणीची तपासणी करुन पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयाचे वैयक्तिक शौचालयाचे अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जिल्हयातील बांधकाम करावायचे शिल्लक असलेले लाभार्थी यांनी प्रोत्साहन अनुदानाकरीता या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून आपली नाव नोंदणी करावी.

तसेच याबाबच्या अधिक माहितीकरीता आपली ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन श्री प्रकाश पोळ गटविकास अधिकारी जामखेड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *