जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 जागा मिळाल्या आहेत. सोळा मे रोजी सभापती निवड तारीख निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी दिवशीच दोन्ही गटाचे सदस्य सहलीसाठी रवाना झालेले आहेत. सभापती व उपसभापती हे चिठ्ठीद्वारे होणार हे जवळपास निश्चित आहे. यात भाजपतर्फे जेष्ठ नेते विष्णू भोंडवे इच्छुक आहेत. व तालुक्यात त्यांना मानणारा मोठा शेतकरी वर्ग आहे.
आता झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले नूतन संचालक विष्णू भोंडवे हे तुळशीराम मुळे यांच्या बरोबर 30 ते 35 वर्षांपासून एकनिष्ठ व प्रा आ राम शिंदे यांचे खांदे समर्थक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे यांचबरोबर मराठा गौरव युवराज भाऊ काशीद, प्रा. सचिन सर गायवळ व भाजपा तालुका अध्यक्ष अजय दादा काशीद यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने या निवडणुकीत विष्णू भोंडवे यांनी मोठं यश मिळवलं आहे
गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पासून समाज कार्याला सुरवात आणि राजकारणात ग्रामपंचायत पासून सुरवात पहिल्यन्दा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच,सरपंच, सोसायटी चेअरमन आणि आता मोठ्या मताधिक्याने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशा मोठा राजकीय प्रवास आहे यांच्याबरोबर शेतकरी, सोसायटी संचालक हे मोठ्या प्रमाणावर बरोबर आहेत व भाजपा चा जेष्ठ चेहरा म्हणून नागरिक त्यांच्याकडे पाहत आहेत व नागरिक त्यांना सभापती कराव अशी मागणी करत आहेत
आमदार प्रा. राम शिंदे व सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांच्या नेतृत्वाखाली स्वाभीमानी शेतकरी विकास पँनल मधुन सभापती पदासाठी विष्णू भोडवे,सचिन घुमरे व शरद कार्ले यांच्या नावाची चर्चा आहे तर उपसभापती पदासाठी
नंदु गोरे,वैजनाथ पाटील व डॉ. गणेश जगताप यांच्या नावाची चर्चा आहे.
तब्बल अडीच वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर जामखेड बाजार समितीची निवडणूक झाली यात
कर्जत पाठोपाठ जामखेड मधील मतदारांनी दोन्ही आमदारांच्या गटाला समसमान कौल देत संपूर्ण महाराष्ट्रात एक चमत्कार केला आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 मिळाल्या आहेत. सोळा मे रोजी सभापती निवड तारीख निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी दिवशीच दोन्ही गटाचे सदस्य सहलीसाठी रवाना झालेले आहेत.
कोणत्याही गटाकडे स्पष्ट बहुमत नाही. धोका नको व कोणी फुटू नये म्हणून दोन्ही गटानी आपापले सदस्य सहलीसाठी घेऊन गेलेले आहेत. सध्या तरी चिठ्ठी द्वारेच सभापती व उपसभापती निवडी होतील अशी परिस्थिती आहे. पण वरील नावाची चर्चा सध्या तालुक्यात आहे.‘
असे असले तरी येत्या सोळा तारखेला कळेचल कोण सभापती व कोण उपसभापती, चिठ्ठी कोणाला साथ देणार हे कळेलच.