जामखेड मध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहरामध्ये सालाबादप्रमाणे शिवराज्याभिषेक उत्सव समिती व श्री शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पारंपारिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करून करण्यात आले.
डोळ्याला पट्टी बांधून दहीहंडी फोडणे या स्पर्धेत बाल गोपाळाणी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गोविंदा पथकाने चित्त थरारक सलामी देऊन दहीहंडी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग या ठिकाणी सादर केली.
प्रथम बक्षीस ७००० रुपये सन्मान चिन्ह शंभूराजे कुस्ती संकुल पथक ,द्वितीय पारितोषिक ५००० रु छ शिवाजी महाराज पथक जामखेड यांनी जिंकले. डोळ्याला पट्टी बांधून स्पर्धेत जिंकणाऱ्याला स्पर्धकाला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
जामखेड दहीहंडी उत्सवाचे हे नवे वर्ष असून भारतीय संस्कृती परंपरा जपण्याचे कार्य यामधून घडते आहे व अशा कार्यक्रमातून शिवभक्त देशभक्त घडवण्याचे कार्य शिवराज्याभिषेक उत्सव समिती करत आहे असे मनोगत शिवप्रतिष्ठान तालुका अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी व्यक्त केले.