ज्ञानराधा मल्टिस्टेट विरोधात ठेवीदारांचे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सो. लि मध्ये गेल्या आनेक महीन्यांपासून जामखेड तालुक्यासह, आजुबाजुच्या तालुक्यातील हातावर पोट भरणाऱ्या अनेक ठेवीदांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. या मुळे ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेत आज शनिवार दि 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील खर्डा चौक या ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले.
यावेळी जामखेड येथील बीड रोडवरील टाळे लागलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थे पासुन ठेवीदारांनी भव्य आशी निषेध रॅली काढली होती. ही रॅली बीड कॉर्नर मार्गे खर्डा चौकात आल्यावर याठिकाणी ठेवीदारांनी तब्बल दोन तास रास्तारोको व आंदोलन केले. यानंतर जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी बोलताना आनेक ठेवीदारांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत ती शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शासनाने पैसै मिळवुन दिले पाहिजेत. समाजव्यवस्था अडचणीची झाली आहे. बेरोजगारांना पगार नाही, नोकर्या नाहीत, सरकारने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ठेवीदार आडचणीत सापडले आहेत. गोरगरिबांची पैसे अडकले आहेत आहे.
यावेळी आनेक शेतकर्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की कष्ट करून ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये आम्ही शेतकरी बांधवांनी पैसे टाकले आहेत. आनेक शेतकऱ्यांनी गाय, बैल व शेती विकून त्याठिकाणी पैसे टाकले आहेत. हे पैसै लवकरात लवकर मिळावेत. येथुन पुढे विचार करून चांगल्या ठिकाणी पैसे ठेवावेत. थोडे व्याज जास्त मिळाले म्हणून त्याच ठिकाणी पैसे टाकले त्यामुळे काय झालं गोरगरिबांच्या फायद्यासाठी आम्ही हे पैसे ठेवले होते. पोलीस प्रशासनाने देखील याबाबत लक्ष दिले नाही भारत सरकारने ही परवानगी दिली आहे व याला राज्य सरकारने देखील मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारनेच यालोकांचे अडकलेले पैसे परत करावेत.
शेवटी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी बोलताना सांगितले की ज्ञानराधा बँकेला परवानगी देणारे संबंधित राजकीय लोकदेखील याला जबाबदार आहेत. या सुरेश कुटेला कोण पाठीशी घालतय याकडे पण पाहणे गरजेचे आहे. गोरगरीबांनी आपले दागिने विकुन व आपली शेती विकुन पैसै बँकेत टाकले आहेत. है पैसे लवकर मिळाले नाही तर लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी हा मोर्चा नेण्यात येणार आहे.
यावेळी रमेश (दादा) आजबे, डॉ प्रदिप कात्रजकर, ॲड महारुद्र नागरगोजे, ह.भ.प बाल कीर्तनकार ईश्वरी नागरगोजे, कॉप्टन लक्ष्मण भोरे, कुंडल राळेभात, लक्ष्मण घोलप, विजय गुंदेचा सह ठेवीदार महीलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, ॲड. प्रमोद राऊत, सुतार सर
डॉ. प्रदीप कात्रजकर, ॲड महारुद्र नागरगोजे, संतोष शिंदे, संदीप गायकवाड, शिवलिंग राऊत, प्रविण राळेभात, बळीराम घोलप, कुंडल राळेभात, कॅप्टन लक्ष्मण भोरे सह हजारो ठेवीदार व नागरीक उपस्थीत होते.