जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायत शांततेत मतदान एकुण ८६.६४ टक्के मतदान

जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायत शांततेत मतदान
एकुण ८६.६४ टक्के मतदान

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जवळा, मतेवाडी, मूंजेवाडी या तीन ग्रामपंचायतीचे मतदान शांततेत पार पडले. मोठ्या असणारया जवळा ग्रामपंचायतमध्ये ८५.४१ टक्के मतेवाडी ग्रामपंचायतमध्ये ८९.२१टक्के तर मुंजेवाडी ग्रामपंचायतमध्ये ९०.६४ टक्के इतके मतदान झाले. अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली .जवळा ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदासाठी ३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

सकाळी जवळा ग्रामपंचायतमध्ये ११ वाजेपर्यंत मतदानाला वेग आला नव्हता. दूपारनंतर कार्यकर्त्यांनी मतदारांची गर्दी वाढली अन् ८५.४१ % मतदान झाले .मतेवाडी मूंजेवाडी ग्रामपंचायतमध्ये मतदानाला सकाळपासूनच वेग होता. छोट्या ग्रामपंचायतमध्येही मतदारांचा प्रतिसाद चांगला राहीला.

तीनही ग्रामपंचायत निवडणुकीत अगदी मतदान पार पडेपर्यंत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अनुचित प्रकार ,गैर प्रकार घडू नये म्हणून स्वतः बंदोबस्तावर लक्ष दिले .

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page