जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड मार्फत आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
जामखेड प्रतिनिधी,
स्री शिक्षणाची जनक आदरणीय सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान मार्फत आज शुक्रवार दि.३ जानेवारी २०२५ रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी म्हणाले आम्ही सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करत असतो आज ३ जानेवारी रोजी आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला
भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे वडील गावाचे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४० मध्ये त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्याशी झाला. त्यांचे वडील गावाचे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात सुधारणा झाली. यामुळे देशातील सर्व मुलींनी शिक्षण घेऊन देशाचे नाव उंचावले.
तसेच यावेळी बोलताना साईबन मंगल कार्यालयाचे संचालक संजय हजारे म्हणाले सावित्रीबाई फुले यांची जयंती ही त्यांच्या योगदानाची आठवण करून देण्यासाठी साजरी केली जाते. त्यांनी भारतीय समाजातील स्त्रिया आणि शोषित वर्गाला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात झाला महिला आणि मुलींसाठी फार मोठे योगदान त्यांनी दिले आहे.
यावेळी साखर सम्राट अशोक चोरडिया यांनी पण आदरणीय सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाला बद्दल फार मोठे योगदान दिले असे म्हणाले
या कार्यक्रमा वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ,संजय हजारे ,साखर सम्राट अशोक चोरडिया, महेश हजारे, किशोर कोरे आदी उपस्थित होते.