जैन श्रावक संघ, जामखेड मार्फत महिला व मुलींविषयी जनजागृती शिबिर.
जामखेड प्रतिनिधी:
आजच्या युगातील विद्यार्थीनी समाजाभिमुख असून त्या फक्त तंत्रस्नेहीच नाही तर, स्वतःच्या सुरक्षेवर, शारिरीक, मानसिक या दृष्टीने सजग व्हायला पाहिजेत. समाजात मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्याख्यान प्रसंगी मुलींनी अनेक प्रश्न व समस्या समाधान केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय येथे बाफना इंडस्ट्रीजचे संचालक आकाश बाफना, विशाल एम्पोरियम चे संचालक शरद शिंगवी व जैन श्रावक संघ जामखेड,यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी दुपारी २.०० वाजता कन्या विद्यालयातील १२०० मुलींना “मॅजिकल सायन्स इंव्हेट व मुलींची सुरक्षा” या विषयावर सुमारे १ तास ममताजी जैन ,दूबई येथील प्रसिद्ध उद्योजिका ,जैनम व जिविका या मुलांनी समुपदेशन केले. अनेक प्रेरक गोष्टी, रूपक आणि प्रबोधनपर असलेल्या आपल्या व्याख्यानामध्ये त्यांनी मुलींना गुंतवून ठेवले होते.
यावेळी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम चौधरी, पर्यवेक्षक संजय हजारे , गुरुकुल प्रमुख बाबासाहेब आंधळे, गुणवत्तावाढ कक्ष प्रमुख अर्चना शिंदे, मोहन यादव,सुनील वारे, अशोक घोडके, विलास पवार, प्रशांत पोकळे,शंभुदेव बडे आदी शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी आकाश बाफना व शरद शिंगवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शंभूदेव बडे यांनी मानले.