जामखेड/प्रतिनिधी….
बोंढार ता.जि.नांदेड येथे बौद्ध समाजातील युवक अक्षय भालेराव याची गावात भिमजयंती साजरी केली म्हणून गावातील जातीयवादी गावागुंडानी निर्घृण हत्या केली…या घटनेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटत आज जामखेड शहरात याचे पडसाद उमटले समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले….
मोर्चाची सुरुवात खर्डा चौकापासून झाली तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात येऊन मोर्चाचे सभेत रुपांतर झाले मोर्चात भिमसैनिक मोठ्या संख्येने हातात निळे ध्वज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन सहभागी झाले होते…सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते…मयत अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे व पीडित कुटुंबाला शासनाने पन्नास लाख आर्थिक मदत देण्याची मागणी मोर्चेकरांनी केली….
यावेळी अनेक समाज बांधवांचे भाषण झाले त्यानंतर तहसिलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले…
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,नगराध्यक्ष निखिल घायतडक, राजन समिंदर, बापुसाहेब गायकवाड,अनिल सदाफुले,दादासाहेब घायतडक, बापूसाहेब ओव्हळ, अतिश पारवे,आजिनाथ शिंदे,उमरभाई कुरेशी,प्रा.राहुल आहेर,राजेंद्र सदाफुले,रजनीकांत मेघडंबर,सचिन सदाफुले,बाबा सोनवणे,सनीदादा सदाफुले,डाॅ.सचिन घायतडक,संदेश घायतडक,किशोर सदाफुले,शेखर घायतडक,दिपक घायतडक,किशोर काबंळे,सुर्यकांत सदाफुले,दिनेश घायतडक,संभाजी आव्हाड,सुकेंद्र सदाफुले,राजू घायतडक
अँड.कृष्णा शिरोळे,मंगेश घोडेस्वार,विक्रांत अब्दुले,सोमनाथ आढाव,सनी प्रिन्स सदाफुले,राकेश घायतडक,सोनू सदाफुले,मनोज डाडर,संतोष थोरात,मिलिंद भोसले,सुमित काबंळे,महीला सुरेखा सदाफुले,अरुणा सदाफुले,मालन घायतडक,कुसुम साळवे…इ आदी शेकडो भिमसैनिक उपस्थित होते..
यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता…