*जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिनर्स असोसिएशन जामखेड ची कार्यकारणी जाहीर*
पेशन्ट आणि डॉक्टर्स यांच्यातील दरी सध्या वाढत आहे ती कमी करण्यासाठी संघटना काम करिन-डॉ संजय राऊत
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिनर्स असोसिएशन जामखेड यांची आज डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ संजय राऊत यांनी कार्यकारणी केली जाहीर….
यावेळी बोलताना डॉ संजय राऊत म्हणाले की
डॉ खैरनार व डॉ रजनीकांत आरोळे यांनी या संघटनेची स्थापना 1987 करून मुहूर्तमेड रोवली.ही संघटना डॉक्टर्स यांच्या मदतीसाठी, व रुग्णांची चांगली सेवा व्हावी म्हणून केली आहे. ही संघटना अगोदर सुरवातीला छोटी होती तेव्हा अध्यक्ष नेमले जायचे व नंतर ह्या संघटनेचा विस्तार वाढला व यानंतर चिट्टी टाकून 2006ला मतदान होऊन पहिले अध्यक्ष डॉ संजय भोरे आले व नंतर 2014 ला मतदान झाले व अध्यक्ष म्हणून डॉ अविनाश पवार निवडून आले व त्यांनी पाच वर्ष काम पहिले व नंतर 2023 ला अध्यक्ष म्हणून डॉ संजय राऊत हे निवडून आले.या संघटनेत 162 सभासद संख्या आहे…
पुढे बोलताना डॉ राऊत म्हणाले,संघटनेच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबीर, नेत्रदान शिबीर मानोविकलंग विध्यार्थ्यांना शिबीर, तपासणी शिबीर,प्रदूषण मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन करणे…
यावेळी डॉ. अथर्व कुंडलिक अवसरे डॉ. अनुष्का प्रशांत वारे डॉ आयान फारुख शेख mbbs कॉलेज ला नंबर लागल्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला….
कार्यकारणी अध्यक्ष डॉ. संजय राऊत, उपाध्यक्ष डॉ. बाबासाहेब कुमाटकर, डॉ मनीषा राळेभात, डॉ. अनिल गायकवाड, सेक्रेटरी डॉ पांडुरंग सानप, खजिनदार डॉ सौ विद्या काशीद, संचालक डॉ प्रकाश खैरनार, डॉ प्रताप गायकवाड, डॉ प्रताप चौरे, डॉ संजय भोरे, डॉ युवराज खराडे, डॉ सुनील वराट , सहायक सचिव अशोक बांगर यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी डॉ चंद्रकांत मोरे, डॉ. सरफराज खान डॉ. तानाजी रालेभात, डॉ. सुनील कटारिया, डॉ. गणेश झगडे डॉ. अर्चना झगडे डॉ. भारती मोरे डॉ. मनीषा अवसरे डॉ. मनीषा राळेभात, डॉ. मनीषा पवार डॉ. प्रशांत वारे डॉ. सागर शिंदे डॉ. शितल कुडके , डॉ.मेघराज चकोर ….. डॉ. गफार शेख, डॉ. अविनाश पवार, डॉ बाळासाहेब मुळीक,डॉ राजकुमार सानप सह डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.