*जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस श. प.शिक्षक सेल कार्यकारिणी जाहीर ..*

जामखेड प्रतिनिधी,

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार दिलीप सोनवणे ,उपाध्यक्ष काकासाहेब देशमुख, प्रवक्ते प्रशांत खामकर व जिल्हाध्यक्ष कर्ण रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल कार्यकारणीचे जाहीर करण्यात आली.

कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या शुभहस्ते निवडी ची अधिकृत पत्रे देण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सरपंच सागर कोल्हे, ऍड.कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे,मयुर भोसले, अशोक चौधरी,संभाजी देशमुख व इतर शिक्षक उपस्थिती होते.

जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल अध्यक्षपदी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा येथील सहशिक्षक बाळासाहेब येवले तर सचिव पदी श्री नागेश विद्यालय जामखेड येथील सहशिक्षक श्री शिंदे बी. एस.यांची निवड करण्यात आली.

शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या ,शिक्षकांचे प्रश्न ,शिक्षक सन्मान,विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता अशा अनेक क्षेत्रात संघटना काम करेल.

*कार्यकारणी खालील प्रमाणे*
१.*अध्यक्ष* – येवले बाळासाहेब बबन
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय जवळा
२.*सचिव* – शिंदे बाबू साहेबराव
नागेश विद्यालय जामखेड
३.*कार्याध्यक्ष* -विधाते बापूराव नवनाथ
इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खर्डा.
४ *उपाध्यक्ष* – शंभू भगवान बडे
कन्या विद्यालय जामखेड.
५ *संघटक*-संतोष माणिक सरसमकर
कन्या विद्यालय जामखेड .
६.*चिटणीस* – वराडे अशोक शिवलिंग
हनुमान विद्यालय दिघोळ
*कार्यकारिणी सदस्य*
१.शेळके प्रशांत भगवान
इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खर्डा
२.नागरे हनुमंत भिमराव
पंचक्रोशी विद्यालय नायगाव
३.फामदे मुक्तेश्वर उत्तरेश्वर
इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज
खर्डा
४ पवार संतोष सुभाष
नागेश विद्यालय जामखेड.
५ देवगुणे संतोष आदिनाथ
खर्डा इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज
खर्डा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *