मंद गतीने चाललेल्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गचे काम होतय निकृष्ट
राष्ट्रवादीचे प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांच्या सह पदाधिकारी करणार अमरण उपोषण
जामखेड प्रतिनिधी,
गेल्या आनेक महीन्यांपासून अतिशय मंद गतीने सुरु असलेल्या व जामखेड शहरातुन जाणार्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत. ठेकेदाराने देखील या कामाकडे पाठ फिरवली आसुन कर्मचाऱ्यांच्या जीवावर कोट्यावधी रुपयांच्या काम सोपवले आहे. या महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे व वेगाने व्हावे यासाठी जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात यांच्या सह पदाधिकारी हे दि १६ नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.
या बाबत जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की जामखेड सौताडा या महामार्ग ५४८ डी.या रस्त्याचे काम जामखेड शहरात चालु आहे मात्र हे काम अतिशय मंद गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा .मधुकर राळेभात यांनी केला आहे.
अंदाज पत्रकानुसार काम होत नाही निवेदेप्रमाणे रस्ताचे खोदकाम नाही ,गरज नसताना कोठारी पंप ते विंचरणानदी या सरळ रस्त्याला लहान वळणे दिली आहेत ते सरळ करावीत, झालेल्या रस्त्याचे कॉक्रीट करनही लेवल मध्ये व अंदाजपत्रकानुसार नाही, पर्यायी वहातूक व्यवस्था न करता रस्त्याची खोदाई करून ट्राफिक अडथळा निर्माण होत आहे, विचरणानदी ते पं. स. समोर या ठीकाणाची गटारी नागमोडी केली आहे ती त्वरीत सरळ करणे, संबंधीत कामावरीती सरकारी अधिकाऱ्यांचे इनस्पेक्शन होत नाही त्या
अधिकाऱ्यांना समज देणे गरजेचे आहे,
कोणीही तज्ञ अधिकारी कामावगैती देखरेख करत नाही तो नेमण्यात यावा व त्याचे रोज निरिक्षण असावे, गटार व ब्रीज साठीचे पाईप निकश प्राप्त नाहीत ते बदलू निकस प्रगत पाईप वापरावेत, मुरूम खडी व कॉक्रीट नियमानुसार वापरले जात नाही त्याची तपासणी करणे,
रस्त्याच्या कामाचा वेग फार कमी आहे ते वाढवणे कामावरील लोकांची सुरक्षीततेची कसलीच उपाय योजना नाही, प्रकल्पावरीती काम करत असताना निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे त्याला जबाबदार असनाऱ्या ठेकेदार प्रोजेक्ट डायरेक्टर प्रोजेक्ट मॅनेजर व शासकिय अधिकारी यांचेवर सदोश मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
करावा.
रस्ता उकरून माती व मुरूम लोकांना विकतात त्याचे पैसे व रॉयल्टीचे पैसे यांचा हिशोब देण्याची गरज आहे. दिवाळीचा सन आहे त्यामुळे रस्त्यावर वहातुकीची कोंडी होत आहे एक
बाजुचा रस्ता वहातुकीस योग्य केल्या शिवाय दुसरी बाजु उकरली जावू नये. आशा विविध मागण्या दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. दि १६ नोव्हेंबर २०२३ पासुन या उपोषणास सुरुवात होणार असून उपोषण काळात काही अघटित घडल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना राहील असे देखील निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देता वेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, प्रा. राजेंद्र पवार शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, प्रशांत राळेभात, अमित जाधव, कुंडल राळेभात, हरिभाऊ आजबे, अवधुत पवार, विजय काशिद, प्रा. राहुल आहिरे, गणेश घायतडक, डॉ. कैलास हजारे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, जयसिंग डोके, सचिन डोके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.