जवळेश्वर रथयात्रा कुस्ती हगाम्यात पैलवान रोहित आव्हाड ठरला जवळेश्वर केसरी.
तर जवळयाचा पैलवान संकेत हजारे विशेष मानकरी .
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील जवळा येथे श्री जवळेश्वर रथयात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती हगाम्यात जवळयाचा पैलवान रोहित आव्हाड हा मानाचा जवळेश्वर केसरी किताबाचा मानकरी ठरला. तर जवळयाचा पैलवान संकेत हजारे हा विशेष मानकरी ठरला.
जवळा येथे जवळेश्वर रथयात्रेनिमित्त मोठ्या स्वरूपात कुस्ती हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक नामांकित पैलवानांनी हजेरी लावली. यावेळी ज्योतीक्रांती मल्टीटेटचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, भाजपाचे युवानेते प्रशांत शिंदे , सरपंच सुशील आव्हाड, भाजपाचे वैद्यकिय आघाडीचे तालुकाध्यक्ष डाॅ.दिपक वाळुंजकर, ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत पाटील, राहूल पाटील,अशोक पठाडे, रफीक शेख,नितीन कोल्हे , प्रेम आव्हाड, भाऊसाहेब महारनवर राष्टवादीचे नय्युम शेख, राजेंद्र महाजण, पुणे पोलीस दिपक कदम, बिबीशन लेकुरवाळे, जवळा सेवा संस्थेचे संचालक मच्छिंद्र सूळ, बबन गोयकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंच म्हणून पैलवान बाबा महारनवर, संजय आव्हाड, प्रभु खरात , राजु सय्यद, राहूल आव्हाड,माऊली कोल्हे, बंटी देवकाते, सुग्रीव ठकाण, जमाल शेख, रावसाहेब जाधव यांनी काम पाहिले. तर कुस्ती हगाम्याचे सुत्रसंचलन प्रसिध्द निवेदक राजु देवकाते यांनी केले.
चौकट – १
ऑलंपिंक चॅम्पीयनच्या वडीलांची हजेरी.
———————————————
ऑलंपिंक चॅम्पीयन पैलवान राहुल आवारे यांचे वडील डबल महाराष्ट चॅम्पीयन बाळासाहेब आवारे यांनी जवळा येथे या कुस्ती हगाम्याला हजेरी लावत, कुस्तीपटुंना प्रोत्साहन दिले.
चौकट – २
महिला कुस्तीपटु गौरी शेळके कुस्ती हगाम्यात.
——————————————
जवळेश्वर रथयात्रेनिमित्त महिला कुस्तीपटु गौरी शेळके हिने कुस्ती हगाम्यात हजेरी लावली. शेळके हिने अन्य दोन महिला पैलवानांसह जवळा येथे उपस्थिती लावली. महिला कुस्तीगीर म्हणून गौरी शेळके हिचे सर्वांनीच कौतूक केले.