कालिका पोदार स्कूल मध्ये अभिरुप संसद सत्र साजरे

जामखेड प्रतिनिधी,

विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रमचे सादरीकरण हेच तर कालिका पोदार लर्न स्कूलचे खास वैशिष्ट्य .शाळेत शिकत असताना समाजातील विविध गोष्टींचा त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा या हेतूने नुकतेच कालिका पोदार लर्न स्कूल मध्ये अभिरुप संसद सत्राचे चित्तथरारक आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे संस्थापक श्री. निलेश तवटे व श्री. सागर अंदुरे प्राचार्य श्री प्रशांत जोशी ,शिक्षकवृंद व पालकवर्ग उपस्थित होते.संसदेच्या सत्रात लोकशाहीचा थरार अनुभवावा, जिथे विद्यार्थी संसदपटूंची भूमिका घेतात, वादविवाद करतात, चर्चा करतात आणि आपल्या जगाला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतात.
या सत्रात देशाच्या संसदेत कामकाज कशा प्रकारे होते, हे समजावं असा त्याचा हेतू होता, त्यामध्ये लोकसभा अध्यक्ष म्हणून समृद्धी चव्हाण, पंतप्रधान म्हणून वेदिका पवार तर परदेशी प्रतिनिधी म्हणून श्रेयांश तवटे, श्रेजल तवटे, श्रेया सगळे यांनी भुमिका निभावल्या. तसेच बाकी वर्ग सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी समाजशास्त्र विभागाचे शिक्षक अलेक्स सर यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच हा कार्यक्रम झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत जोशी सर तसेच शाळेचे विश्वस्त श्री. निलेश तवटे व श्री. सागर अंदुरे यांनीही मुलांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *