कर्जत-जामखेड मतदारसंघातील २७ रस्त्यांच्या कामांसाठी ५१ कोटींचा भरघोस निधी मंजुर !
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -३ : आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश
कर्जत-जामखेड :-
महायुती सरकारने नवरात्रोत्सवाची कर्जत जामखेडकरांसाठी मोठी भेट दिली आहे.ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – ३ अंतर्गत २७ रस्त्यांच्या कामांसाठी ५१ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या अथक प्रयत्नांमुळे या निधीस मंजुरी मिळाल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे.
विधानपरिषदेचे आमदार झाल्यापासून आमदार राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसह इतर अनेक कामांसाठी आजवर करोडो रूपयांचा निधी खेचून आणला आहे. आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून त्यांनी ५१ कोटी रूपयांचा निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे. मतदारसंघात रस्त्यांचे मजबुत जाळे निर्माण करण्याकरिता नेहमी सतर्क असल्याचेच आमदार शिंदे यांनी यातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
आमदार प्रा. राम शिंदे यांनी सदरचा निधी प्राप्त व्हावा याकरिता घेतलेली मेहनत व केलेल्या जोरदार पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना – टप्पा ३ या योजनेतून २७ रस्त्यांची कामे मंजुर झाली आहेत. यामध्ये कर्जत तालुक्यातील १८ व जामखेड तालुक्यातील ०९ रस्त्यांचा समावेश आहे. हे २७ रस्ते विविध गावांना जोडणारे आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील २७ रस्त्यांच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला ५१ कोटी रुपयांचा निधी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या अथक प्रयत्नांमुळे या योजनेला गती मिळाली आहे. यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
कर्जत तालुक्यातील मंजुर रस्ते खालील प्रमाणे
प्रजिमा १०१ ते कुरणाचीवाडी रस्ता -१९२ लक्ष, चांदे बुद्रुक ते शिर्के वस्ती रस्ता – १८३ लक्ष, चांदे बुद्रुक ते लाघुडेवस्ती रस्ता – १३२ लक्ष, रामा ५४ खेड – मानेवाडी – शिंपोरी रस्ता – २५० लक्ष, चिवलडी ते सरकाळेवस्ती रस्ता – २३८ लक्ष, दुधोडी ते दत्तनगर रस्ता – १३५ लक्ष, रोटेवाडी गावडेवस्ती ते कुंभळी रस्ता – ४५३ लक्ष, रामा ६७ ते गुंडवाडी रस्ता – १६० लक्ष, शिंदे ते ढगेवस्ती रस्ता – १४९, कुळधरण ते दुरगाव रस्ता – २३० लक्ष, चिलवडी ते मोहळकर वस्ती रस्ता – १३५ लक्ष, रामा ६७ कोरेगाव फाटा ते कोरेगाव रस्ता – २९४ लक्ष, राशिन रोड (SH54) ते देशमुख वाडी रस्ता – १८८ लक्ष, निमगाव गांगर्डा ते जिल्हा हद्द रस्ता – २२७ लक्ष, MDR 115 ते कापरेवाडी रस्ता – १२३ लक्ष, कुंभेफळ (इजिमा ३३७) ते मुसलमानवाडी रस्ता – ६७ लक्ष, शेगुड ते शेगडेवस्ती रस्ता – २५६ लक्ष, पाटेगाव ते नवसरवाडी रस्ता – २२५ लक्ष रूपये.
जामखेड तालुक्यातील मंजुर कामे खालीलप्रमाणे
मोहा ते रेडेवाडी रस्ता – ११९ लक्ष, रामा ५६ (करमाळा रस्ता) ते निमोणकरवस्ती – १०९ लक्ष, वंजारवाडी पिंपळे ते नन्नवरे वस्ती रस्ता – २८५ लक्ष, देवदैठण ते भूईदरा रस्ता – १४६ लक्ष, अरणगाव ते मळईवस्ती रस्ता – ९६ लक्ष, फक्राबाद ते उबाळेवस्ती रस्ता – ११९ लक्ष, वंजारवाडी ते तिंत्रज जिल्हा हद्द रस्ता – २१६ लक्ष, डोणगावकर ते सातववस्ती रस्ता – १०० लक्ष, कवडगाव ते कदमवस्ती रस्ता २०७ लक्ष