*कर्जत जामखेडमधील २६ नागरिकांना श्रवण यंत्रांचं वाटप*

*आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उपक्रम*

कर्जत जामखेड प्रतिनिधी,

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आणि ठाकरसी ग्रुप व स्वरूप चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बारामती येथे मोफत डिजिटल श्रवणयंत्र पूर्व तपासणी व वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरीमध्ये कर्जत जामखेडमधील २६ नागरिकांना मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना या शिबिरासाठी नेण्यात आले होते. त्यातील ज्या नागरिकांना श्रवण यंत्रणाची आवश्यकता होती त्यांना शिबिराच्या माध्यमातून श्रवण यंत्र देण्यात आले.

वाढत्या वयासोबत ऐकू न येणं किंवा कमी ऐकू येणं या प्रश्नांना अनेक ज्येष्ठ मंडळींना सामोरं जावं लागतं. विशेषतः वयाच्या साठीनंतर अनेकांना हा त्रास होतो. गाडीच्या हॉर्नचा आवाज किंवा हाक मारलेली ऐकू न आल्यामुळं एखादा अपघात होण्याचाही धोका असतो. ग्रामीण भागात अनेकजण याकडं दुर्लक्ष करतात. काही वेळा तपासणी आणि श्रवण यंत्रासाठी लागणारा खर्च पाहिला तर नागरिक स्वतःच दुर्लक्ष करतात. हिच बाब लक्षात घेऊन बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने, ठाकरसी ग्रुप व स्वरूप चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मोफत श्रवण यंत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत जामखेडमधील गरजू नागरिकांना नेण्यात आले होते. या शिबिरात २६ नागरिकांना याचा लाभ झाला असून त्यांना श्रवण यंत्र देण्यात आले.

आमदार रोहित पवार हे देखील मतदारसंघांत ठिकठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, श्रवण यंत्र वाटप शिबीर आयोजित करत आहेत आणि या शिबिराच्या माध्यमातून गरजूंना लाभ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *