*कर्जत जामखेड विधान सभा मतदार संघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १९१३.४९ लक्ष रुपयांचे रस्ते मंजूर – खा.डॉ.सुजय विखे पाटील*

जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या कर्जत जामखेड या विधानसभा मतदार संघातील अकरा रस्ते हे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाले असून या अकरा रस्त्या करिता १९१३.४९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

याशिवाय पुढील पाच वर्षे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी ९०.६२ लक्ष रुपये देखील मंजूर करण्यात आले असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत,कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात हे 11 गावांतर्गत रस्ते मंजूर झाले असून या मध्ये प्रामुख्याने जातेगाव ते केदारेश्वर मंदिर रस्ता,सारोळा ते काटेवाडी रस्ता धामणगाव ते जिल्हा हद्द रस्ता, पिंपळगाव उंडा ते जगताप
वस्ती रस्ता, आपटी ते गव्हाणवस्ती रस्ता,अरणगाव ते निगुंडे वस्ती रस्ता, रावळगाव ते चिंतामणी मंदिर रस्ता, खंडवी ते टरमाळवाडी रस्ता, राशीन ते झिरावस्ती रस्ता, निंबे ते डोमाळवाडी रस्ता,सिद्धेश्वर मंदिर बोरमळा ते जुना वाळुंज रस्ता या रस्त्यांचा समवेश आहे.

या संदर्भात राज्याच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने उपाचिव श्री प्रशांत पाटील यांच्या स्वाक्षरीने या संबंधीचा आदेश निघाला असल्याचे त्यांनी सांगून या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ लवकरच करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावास मुख्य रस्त्यास जोडण्याचे आपले स्वप्न असून हे आपण बऱ्यापैकी पूर्ण केले असून उर्वरित गावांसाठी देखील लवकरच मंजूर करुन तेही कामे सुरू होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान कर्जत – जामखेड विधान सभा मतदार संघातील या अकरा रस्त्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून दिल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन, महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री   प्रा राम शिंदे यांचे त्यांनी यावेळी विशेष आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *