जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतचे विभाजन व्हावे यासाठी आज दि. २४ जुलै रोजी घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतच्या सर्वच १७ सदस्यांनी आपला पाठिंबा दिला असून ग्रामसभेचा महत्त्वाचा मुद्दा असणारा विभाजनाचा प्रश्न आज मार्गी लागला सर्वानुमते ग्रामपंचायत ग्रामसभेत ठराव मंजूर करून सदस्यांनी सह्या केल्या व तेरा सदस्यांनी आपले मत व्यक्त करून ग्रामपंचायत विभाजनाला आमचा पाठिंबा आहे असे ग्रामस्थांना सांगितले.
खर्डा येथील काही युवकांनी गावाचा योग्य प्रकारे विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायत विभाजनाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यानुसार यापुर्वी झालेली ग्रामसभा व मासिक सभा यामध्ये हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र यास काही ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केल्याने काल दि. २४ जुलै रोजी विरोधी सदस्यांच्या भूमिकेच्या विरुद्ध खर्डा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. दि. १२ जुलै रोजी खर्डा ग्रामपंचायत ने ग्रामसभा आयोजित केली होती
त्यावेळी गावातील तरुणांनी खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव अचानकपणे ग्रामसभेत मांडला होता १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १४ ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाला पाठिंबा असल्याचे ग्रामस्थान समोर उभे राहून सांगितले होते यासंदर्भात २१ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १६ ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते. त्यापैकी सत्ताधारी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुकीच्या एक वर्षे अगोदर खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा निर्णय घेण्याचा विषय मीटिंगमध्ये मांडला त्याला आठ ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध करून ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव मासिक मीटिंगमध्ये करावा अशी मागणी केली व विभाजनाचा ठराव होण्यासाठी आठ ग्रामपंचायत सदस्य बाजूने उभे राहिले तर सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनाचा लगेच होणाऱ्या ठरावाला विरोध केला.
त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी अचानक भूमिका बदलल्या कारणामुळे काल खर्डा शहरातील युवक शेतकरी, व्यापाऱ्यांनी, शहर बंद ठेवले होते.
आज दिनांक २४ जुलै रोजी ग्रामसभेत या ग्रामस्थांच्या मागणीला १७ सदस्यांनी ग्रामपंचायत विभाजनाला आज पाठिंबा दिला व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी १७ सदस्यांपैकी १३ सदस्य उपस्थित होते व ४ सदस्य गैरहजर होते तरी या १३ सदस्यांनी आपले एक मत जाहीर करून ग्रामपंचायत विभाजनाला पाठिंबा दिला.
यावेळी ग्रामस्थांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर पत्रकारांचे व ग्रामपंचायत निर्णयाचे आभार व्यक्त केले. सर्वांनी सोबत राहून एकजुटीने खर्डा गावाचा विकास करण्याचा निर्णय केला
पाठिंबा देणारे १३ सदस्य
वैभव जमकावळे, सुनिता दीपक जावळे, महेश दिंडोरे ,संजीवनी वैजनाथ पाटील , रोहिणी प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे , पुनम अशोक खटावकर, दैवशाला सखाराम काळे, सोपान गोपाळघरे , शितल सुग्रीव भोसले, मदन पाटील, श्रीकांत लोखंडे , राजू मोरे
गैरहजर सदस्य..
नमिता आसाराम गोपाळघरे, सीमा भगवान दराडे, कांचन गणेश शिंदे, नवनाथ होडशीळ
प्रतिक्रिया
ग्रामपंचायत विभाजनाला आमचा पाठिंबा होता व आज आम्ही सर्व सदस्य सर्वानुमते ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत विभाजनाला मंजुरी दिली आहे. ग्रामस्थांचा हा मुद्दा विकासासाठी होता. जर ग्रामस्थांना यापुढे ग्रामपंचायत विभाजन करण्याच्या बाबतीत अडचणी आल्या तर मी आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करून त्यांना योग्य ती मदत करेल व गावाचा सर्वांगीण विकास करेल.
सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील