ल. ना. होशिग विधालय येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्त नगरसेवक अमिंत भाऊ चिंतामणी यांच्या वतीने ओपन गरबा दांडिया चे आयोजन….

बाईपण लय भारी देवा या चित्रपटातील सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी व शिल्पा नवलकर यांची प्रमुख उपस्थिती !

नगरसेवक अमिंत भाऊ चिंतामणी यांनी मानले सर्व नागरिक व महिलांन चे आभार !

जामखेड प्रतिनिधी –

ल. ना. होशिंग विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आरती करुन झाली.सामाजिक सलोखा राखण्याचे काम अमिंत भाऊ चिंतामणी यांनी केले आहे. तसेच यावेळी
आशाताई शिंदे बोलतानी म्हणाले आहे कि,
लोक कारखाने घेतात, साखर खातात, मळी खतात, ऊस खातात आणि जामखेड करांना कारखान्याचा धुराळाचा धुराचे प्रदुषण देतात राम शिंदे साहेब जनतेच्या विचाराचे गुराळ चालवतात.

जामखेड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती मा. डॉ. भगवान मुरुमकर म्हणाले की, सलग नऊ वर्षे झाली नगरसेवक अमित चिंतामणी हे कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने गरबा दांडिया रास कार्यक्रमाचे आयोजन करतात. काही पुढारी असतात निवडणूका लागल्या की, पांढरेशुभ्र कपडे घालून फिरतात. परंतू नगरसेवक अमित चिंतामणी व बिभिषण धनवटे यांच्या सारखे नगरसेवक कायम लोकांमध्ये राहून त्यांच्या अडी अडचणी सोडवितात.

महिलांना देव दर्शनासाठी स्वखर्चातुन पाठविण्याची व्यवस्था करतात. सामाजिक काम करणाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही.बाईपण भारी देवा फेम सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी- मोने व शिल्पा नवलकर, या अभिनेत्री जामखेडकर महिला व त्यांचा प्रतीसाद पाहून भारावल्या पुणे येथील अंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नक्षत्र मंगळागौरी ग्रुप व जामखेड येथील मंगळागौरी ग्रुप व सर्व महिलांनी तुफान धमाल केली. ऐरवी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःला अगदी व्यस्त करुन घेतलेल्या महिलांनी नगरसेवक मा. अमित चिंतामणी यांच्या माध्यमातून आयोजित गरबा दांडिया या कार्यक्रमाचा मनसोक्तपणे आनंद घेतला.

तसेच यावेळी आशाताई राम शिंदे, नगरपरिषद चे मुख्याधिकारी अजय साळवे, डॉ. भगवान मुरूमकर, सचिन सर गायवळ, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शरद कार्ले, जामखेड तालुका अध्यक्ष अजय दादा काशिद,फिरोज कुरेशी, जमीर सय्यद, अर्चना राळेभात, जमीर सय्यद, मंगेश दादा आजबे, केदार रसाळ, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मनोज कुलकर्णी, राजेश मोरे, काका गर्जे सोमनाथ पाचर्णे, संतोष गव्हाळे, सुनील यादव, आ. राम शिंदे साहेब चे पी. ए. डॉ. आलताब शेख, नगरसेवक बिभीषण धनवडे, विनायक राऊत, शशिकांत देशमुख, अनिल यादव,बिट्टू मोरे, नेते मंडळी, नागरिक मोठय़ा संख्येने महिला मंडळी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *