कुसडगाव येथे आधार शिबिर सम्पन्न
जामखेड प्रतिनिधी
कुसडगाव तालुका जामखेड येथे डाक विभागा मार्फत आधार शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये लोकांचे नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड मध्ये पत्ता, नाव, फोटो, जन्मतारीख दुरुस्ती करणे, आधार ला मोबाईल लिंक करणे आदि कामे करण्यात आले.
आधार चे ऑपरेटर म्हणून जगदीश पेनलेवाड यांनी काम पाहिले.
या शिबिराचा लाभ कुसडगाव मधील अनेक नागरिकांनी घेतला.
यावेळी उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, डाक आवेक्षक बापूराव पंडित व कुसडगाव चे सरपंच अंकुश कात्रजकर, उपसरपंच नागेश कात्रजकर, पोलिस पाटील निलेश वाघ, शिवाजी कात्रजकर, नारायण कात्रजकर, शैलेश कुलकर्णी, दत्तात्रय सातपुते, रेवननाथ काकडे, आनंद कात्रजकर आदि उपस्थित होते
या शिबिरात जगन्नाथ हंबीरराव, गणेश हजारे,धनराज राजे भोसले, विद्या सानप,सारीका मराठे यांनी अनेक लोकांचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक चे नवीन खाते उघडून दिले व आधार मोबाईल लिंकीग करून दिले.
डाक विभागातील विविध सेवांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांनी यावेळी केले.