मंबई येथे आरक्षणासाठी निघालेल्या पदयात्रेस सढळ हाताने योगदान द्यावे

मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आवहान

जामखेड प्रतिनिधी

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणासाठी निघालेली पदयात्रा ही अहमदनगर येथे दि २१ रोजी मुक्कामी येत आहे. अहमदनगर येथे मनोज जरांगे पाटिल यांच्या सोबत मुक्कामी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव शेतकरी व कष्टकरी येणार आहेत त्यामुळे या मराठा समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. चार भाकरी प्रेमाच्या तुमच्या आमच्या मुलांच्या भविष्याच्या हे घोष वाक्य घेऊन जामखेड तालुक्यातुन जास्तीत जास्त बांधवांनी कोरडा शिधा व पाण्याची बॉटलची मदत देऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जामखेड शहर सह तालुक्यातील सर्व समाज बांधवांना जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या अवाहन करण्यात येत आहे की, संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा चलो मुंबई पायी मोर्चा बाराबाभळी, अहमदनगर येथे २१ तारखेस मुक्कामी येत आहे. अहमदनगर येथे मनोज जरांगे पाटिल यांच्या सोबत मुक्कामी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या शेतकरी व कष्टकरी समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था आपल्याला करावयाची आहे. त्यासाठी आपण अन्नधान्य स्वरूपात कोरडा शिधा, चिवडा, लाडु, चटणी, लोणचे, भाकरी तसेच पाण्याच्या बाटली सह सढळ हाताने योगदान देऊन आपण आपले कर्तव्य पार पाडावे.

तसेच ज्यांना कोरडा शिधा किंवा इतर काही मदत द्यावयाची आहे त्यांनी रविवार दिनांक २१/१/२०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आपली मदत तहसिल कार्यालया समोर, जामखेड येथे जमा करावी.जमा झालेली सर्व मदत अहमदनगर येथे मुक्कामाचे ठिकाणी पोहच करण्यात येईल.

मदतीचा हात देण्यासाठी विकास राळेभात मो. 9881704200, केदार रसाळ मो. 9689889888, अवधूत पवार मो. 8070307070, तात्याराम बांदल मो. 9226218979, महेश यादव मो. 9021957777 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.

अत्तापर्यंन्त मंबई येथे निघणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या पायी पदयात्रेसाठी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ यांनी अहमदनगर येथील मनोज जरांगे पाटिल यांच्या मुक्कामाचे नियोजन करणार्‍या स्वयंसेवकासाठी ५०० टी शर्ट देण्यात आले आहेत. तसेच शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड च्या वतीने सहा हजार पत्रावळी व ग्लास पाठवण्यात आले आहेत. आडत व्यापारी रामहरी गंडाळ यांनी दोन क्विंटल बुंदीचे पॅकेट ,लेहनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने १०१ पाणी बॉक्स, महाशक्ती ॲम्ब्युलन्स असोशियशन च्या वतीने १० ॲम्ब्युलन्स ची सोय तर रामेश्वर ॲग्रो चे संचालक उदय शिंदे यांच्या वतीने ५० पाणी बॉक्स देण्यात आले आहेत.

ॲड. घनश्याम राळेभात पाटील व ॲड विशाल वारे पाटील यांच्या कडुन १०० पाणी बॉक्स देण्यात आले आहोत. विषेश म्हणजे ॲड संग्राम पोले व ॲड गणेश पाटील यांच्या वतीने १३०० मोतीचूर लाडू तसेच जामखेड मुस्लिम पंच कमीटीच्या वतीने १५० पाणी बॉक्स देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *