मराठा आरक्षणासाठी जामखेड शहरासह तालुक्यात कडकडीत बंद!!
जामखेड प्रतिनिधी,
संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच जामखेड शहरात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जामखेड शहरात भव्य मोटारसायकल रँली काढण्यात आली याच अनुषंगाने जामखेड तालुका वकील संघटनेच्या वतीने दिवसभर कामकाज बंद ठेवत मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला तर पुकारलेल्या बंदला
शहरासह तालुक्यात शंभर टक्के पाठिंबा मिळाला.
मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण, महिलांचे उपोषण, कँन्डल मार्च आणि आता बंद पुकारण्यात आला होता. जामखेड तालुका वकील संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जामखेड शहरातून भव्य अशी मोटारसायकल रँली काढण्यात आली. ही रँली बीड रोड, कान्होपात्रा नगर, तपनेश्वर रोड, खर्डा चौक मार्गे तहसील कार्यालयासमोर आली यानंतर तहसील योगेश चंद्रे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याठिकाणी घोडेगाव येथील ग्रामस्थ साखळी उपोषणाला बसले होते येथे आल्यानंतर वकील संघटनेच्या वतीने आपापल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जामखेड शहरासह तालुक्यात पुकारलेल्या बंदला व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जामखेड शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. याचबरोबर आजच्या साखळी उपोषणाला बसलेल्या घोडेगाव येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या.