आमदार प्रा.राम शिंदे यांनी साजरा केला बैलपोळा
जामखेड प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या जीवनात बैलपोळा या सणाला महत्वाचे स्थान आहे. यंदा बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या चोंडी या गावी पारिवारिकपणे बैलपोळा हा सण साजरा केला.
आमदार प्रा राम शिंदे यांनी चोंडी (देवकरवाडी) येथील सुभाष (तात्या) शिंदे यांच्या शेतात पारिवारीकपणे बैलपोळा हा सण साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी आमदार शिंदे यांनी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाचारणे, पांडुरंग उबाळे, अशोक देवकर, उद्योजक विशाल शिंदे, मिलींद देवकर, शंकर शिंदे, आलेश शिंदे, अशोक शिंदे, सुदाम मोरे, सुनिल शिंदे, राजेंद्र शिंदे, श्रीकांत शिंदे, रवि शिंदे, अजिंक्य शिंदे, प्रकाश शिंदे, साहिल शेख, तुषार मोरे, आकाश शिंदे सह आदी उपस्थित होते.