आमदार योगेश टिळेकर यांनी घेतले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे दर्शन
जामखेड :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या जन्मगावी भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार योगेश टिळेकर यांनी बुधवारी सायंकाळी भेट देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. यावेळी आमदार टिळेकर यांचे आमदार प्रा राम शिंदे व शिंदे कुटूंबियांनी यथोचित सन्मान करत स्वागत केले.
माळी समाजाचे नेते योगेश टिळेकर यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली आहे. त्यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर योगेश टिळेकर यांनी सोलापुर व अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांचा दौरा जाहिर केला. या दौर्यात ते माळी समाजाचे ऊर्जास्त्रोत संत सावता महाराज यांच्या समाधीचे दर्शन व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी येथील स्मारकास अभिवादन करणार आहेत. त्यानुसार आमदार योगेश टिळेकर यांनी बुधवारी 30 जुलै रोजी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी येथील स्मारकास भेट दिली. या भेटीत त्यांनी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देत अभिवादन करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकल यांचे आशिर्वाद घेतले. या दौरायाचे प्रमुख म्हणून भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश महामंत्री विनोद दळवी यांनी चोख जबाबदारी पार पाडली.
आमदार योगेश टिळेकर यांचे कर्जत तालुक्यातील राशिन, बेनवडी, कर्जत शहर, आंबी जळगाव तसेच जामखेड तालुक्यातील चोंडी, जवळा या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांसह ओबीस समाजातील कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. त्यांचा ठिकठिकाणी भव्य नागरि सत्कार करण्यात आला. आमदार योगेश टिळेकर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे, पत्नी आशाताई शिंदे व स्वता: आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदार योगेश टिळेकर यांचा यथोचित सन्मान करत सत्कार केला. यावेळी आमदार टिळेकर यांनी आमदार प्रा राम शिंदे व त्यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांचे आशिर्वाद घेतले.
आमदार योगेश टिळेकर यांचे जामखेड तालुक्यात आगमन झाल्यानंतर जानखेड तालुका भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विष्णू गंभीरे, भाजपा तालुका सरचिटणीस पांडुरंग उबाळे, नगरसेवक डाॅ ज्ञानेश्वर झेंडे, सोमनाथ पाचरणे, बापुराव ढवळे व चोंडी ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश महामंत्री विनोद दळवी, कोंभळीचे सरपंच राहुल गांगर्डे, भाजपा नेते संपत बावडकर, भाजपा कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, सरपंच नितीन खेतमाळीस, बाजार समितीचे माजी उपसभापती प्रकाश शिंदे, विशाल भांडवलकर, अनिल उबाळे, दिनेश शिंदे, आलेश शिंदे, भाऊसाहेब राऊत, सह आदी उपस्थित होते.
चौकट
“राज्यकारभाराचा वेगळा आदर्श ज्या राजमातांनी या समाजाला दिला त्यांचा आशिर्वाद घेऊन विधान परिषदेच्या आमदारकीचा कारभार करावा या भूमिकेतूनच श्री क्षेत्र चोंडी येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले व राजमाता अहिल्यादेवींचा आशिर्वाद घेतला व मी माझ्या कामाची सुरुवात आजपासून केली आहे. भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. समाजातील सर्व घटकाला न्याय देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार. सर्वांना सोबत घेऊन काम करनार”
– आमदार योगेश टिळेकर