*जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित रक्तदान महायज्ञ**रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान..🩸*

जामखेड उद्या भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन…

जामखेड तालुका प्रतिनिधी

जामखेड -अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज- जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम ता.जि-रत्नागिरी (महाराष्ट्र)
यांच्या कृपाआशीर्वादाने तसेच पीठाचे उत्तराधिकारी प.पु. कानिफनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधी मधे संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यात भव्य महारक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे…

दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या *जामखेड शहरात रविवार दि.12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 07 ते सायंकाळी 06 या वेळेत जामखेड ग्रामीण रुग्णालय येथे भव्य-दिव्य महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे,तरी *जामखेड पंचक्रोशी* मधील सर्व ग्रामस्थांनी या महारक्तदान शिबिराला उपस्थित राहुन *रक्तदानाच्या महाकुंभा* मध्ये रक्तदान करून आपला पुण्यसंचय वाढवावा…एक रक्तदान केल्याने तीन जणांचे प्राण वाचू शकतात…

रक्तदानातून समाजातील गरजवंतांचे प्राण वाचावे ही जगद्गुरु माऊलींची संकल्पना आहे… तसेच 18 जानेवारी 2025 रोजी खर्डा या ठिकाणी देखील रक्तदान शिबिर आयोजित केले आहे….तरी आपणा सर्वांना विनंती करण्यात येत आहे की या भव्य रक्तदान शिबिरा मध्ये सर्वानी सहभागी व्हावे,असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे……
*रक्तदान केल्याचे फायदे:-*रोग प्रतिकारशक्ती वाढते* रक्तदान केल्यावर शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना प्रेरणा मिळून 48 तासात नवीन शुद्ध रक्त पूर्णपणे भरून निघते* 3 ते 4 महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *