*पोलीस बॉईज असोसिएशनच्या अहिल्यानगर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी स्मिता गुलाटी यांची निवड*

जामखेड प्रतिनिधी,

पोलीस बॉईज असोसिएशनची पश्चिम महाराष्ट्राची बैठक उत्साहात पार पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवी भाऊ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय दराडे बारामती व अहिल्यानगर पोलीस बॉईज महिला आघाडीच्या स्मिता गुलाटी जामखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस बॉईज असोसिएशनची पुढील दिशा ठरवण्यात करिता पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाली.

या बैठकीमध्ये पोलीस व पोलीस कुटुंबीयांच्या व जनतेच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली नवीन सरकार मध्ये स्वतंत्र गृह मंत्री असला पाहिजे मागील शिंदे सरकारने अनेक जातीसाठी वेगवेगळे महामंडळ तयार करण्यात आले त्याच भरतीवर पोलिसांच्या मुलांचीही तुकाराम ओंबळे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे व बेरोजगार पोलीस पाल्यांना त्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून त्याद्वारे उद्योग धंद्याचे निर्मिती होईल.

 

2013 मध्ये जी पोलीस कर्मचारी पीएसआय ची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना तात्काळ पोलीस उपनिरीक्षक पदी देण्यात यावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या मुलांकरिता वस्तीगृहाची निर्मिती करण्यात यावी पोलीस वाल्यांना शैक्षणिक आरक्षण मिळण्यात यावे असे अनेक विषयावर यामध्ये चर्चा करण्यात आली यावेळी संस्थापक रवी वैद्य राष्ट्रीय संघटक माणिक निमसे कोर कमिटी सदस्य गोकुळ दाभाडे प्रदेशाध्यक्ष विकास सुसर प्रदेश सहसचिव प्रमोद खाडे

प्रदेश कार्यकारणी सदस्य अरुण सदाशिव अरुण दाभाडे उद्योग आघाडीचे दत्तात्रय धोकटे मामा विद्यार्थी आघाडीची सागर बनसोडे युवक आघाडीचे प्रा रवी अंभोरे सुनील पारखे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री दाभाडे शितल खरात वैशाली दवंडे अंजुषा कुलकर्णी संध्या जैन अलका खरात आशा खरात मीना पवार कुसुम हेगडे व जामखेड तालुक्यातून अनुष्का वारे उषा जास भाटी कुंदा गुळवे सुनीता कांबळे देवशाला गुळवे सुशीला गुळवे उषा सदाफुले ज्योती गायकवाड शोभा सुरवसे सोनाली दळवी स्वाती पिसाळ जामखेड तालुकाध्यक्ष अरुण शिरसाठ महादेव रसाळ सुधीर साठे आनंद कोळपकर विनोद परदेशी सचिन बकरे खंडू कांबळे संजय गोरे दिलीप देशमुख भगवान नागरगोजे अशितोष दराडे शेख कैसर प्रवीण मोरे हे सर्व बैठकीत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *