पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या वतीने शहरातील संविधान स्तंभास अभिवादन करून बदलेल्या कायदेविषयक जनजागृती
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड मध्ये काल दि.१ जूलै रोजी पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असलेल्या भारतीय कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या वतीने जामखेड शहरातील संविधान चौकातील संविधान स्तंभास अभिवादन व सुसंवाद मेळाव्याचे कार्यक्रम संपन्न झाला.
काल दि.१ जुलै २०२४ रोजी दुपारी २:३० ते ३:३० दरम्यान जामखेड न्यायालय व सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास संविधान चौक येथे पार पडलेल्या या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमासाठी प्रामुख्याने यावेळी जामखेड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. जोशी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्रिन्सिपॉल विकी घायतडक, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशिद, जेष्ठ नेते हरिभाऊ बेलेकर,विवेक कुलकर्णी
भिम टोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, युवक नेते संतोष गव्हाळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे, अॅड. संदीप नागरगोजे, अॅड. काशीद, अॅड. नितीन घुमरे, अॅड. संग्राम पोले, अॅड. हर्षल डोके, अॅड. प्रमोद राऊत आदिंसह समाजातील विविध पक्षसंघटनांचे पदाधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी व सभासद तसेच पोलीस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय पुरावा कायदा कायद्यां ऐवजी नव्याने अंमलात आलेले भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता व भारतीय साक्ष अधिनियम या संदर्भात कायद्याविषयक जनजागृती करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी बदललेल्या कायद्याविषयी नागरिकांना मार्गदर्शन करत कोणकोणते कायदे बदललेले आहेत, कोणत्या कलममात बदल झाला आहे या विषयी माहिती नागरिकांना दिली.