विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी चांगले प्रेरणास्थान शोधावे – पोलीस निरीक्षक महेश पाटील

पोलीस विभागामार्फत विद्यार्थ्यांनी घेतले शस्त्र प्रशिक्षण

जामखेड प्रतिनिधी :-

जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय मध्ये पोलीस रेझिंग डे सप्ताह निमित्त शस्त्र प्रशिक्षण व विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले.

मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते झाले तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापक संजय हजारे ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के , एनसीसी ऑफिसर मयूर भोसले,पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे,पोलीस नाईक अविनाश ढेरे, रघुनाथ मोहळकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, सुग्रीव ठाकरे,अशोक सांगळे व नागेश कन्या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
एनसीसी च्या वतीने पोलीस विभागाला मानवंदना देण्यात आली.यावेळी सुरुवातीला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे यांनी पोलीस दलातील एस एल आर रायफल, इन्सास रायफल ,9 एम एम पिस्टल याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

तसेच एनसीसी कॅडेट व विद्यार्थ्यांना रायफची हाताळणीचे जोडणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले व आपत्ती व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस रेझिंग डे निमित्त पोलीस विभागांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी समाजामधील चांगले व्यक्ती प्रेरणास्थान शोधावेत. त्यामुळे आपले भविष्य चांगले घडते . विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही ठिकाणी कोणताही प्रकारचा लैगिंक छळ होत असेल तर त्याला कायद्याने कारवाई केली जाईल.

सर्वाना सायबर क्राईम ची माहिती असणे गरजेचे आहे चुकीच्या वेबसाईटचा वापर टाळावा. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर करू नये . विद्यार्थी विद्यार्थिनींनी वाईट स्पर्श संदर्भात जागृत राहावे अनुचित प्रकार होत असेल तर पालकांना शिक्षकांना माहिती द्या.
एक भारत श्रेष्ठ भारत एनसीसी कॅम्प प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीते करिता पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे , हवालदार प्रवीण इंगळे ,एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी प्रयत्न केले.
प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के यांनी केले.
सूत्रसंचालन संभाजी इंगळे, आभार कोकाटे व्ही के यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *