अखेर मुहूर्त ठरला प्रा मधुकर (आबा ) राळेभात करणार भाजपात प्रवेश
जामखेड:
रोहित पवारांच्या हिटलरशाही कारभाराविरोधात बंडाचा पहिला झेंडा फडकावणारे राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात यांचा भारतीय जनता पार्टीतील प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या २३ सप्टेंबर रोजी जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात हे भाजपात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडणार आहे.
जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांचा भारतीय जनता पार्टीत येत्या २३ रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
प्रा मधुकर राळेभात यांचा भाजपातील प्रवेश रोहित पवारांना व त्यांच्या राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का देणारा ठरणार आहे. राळेभात यांची मतदारसंघात मोठी राजकीय ताकद आहे. ते भाजपात प्रवेश करणार असल्याने रोहित पवारांच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रा राळेभात यांच्या रूपाने भाजपने रोहित पवारांना मोठा धक्का दिला आहे.