प्रेम आनंद कोठारी बारावी परीक्षेत उतुंग भरारी,९२.८३ मार्क मिळवत उत्तीर्ण
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील उद्योजक कांतीलाल चंदुलाल कोठारी यांचा नातू आणि युवा उद्योजक आणि चंदूकाका ज्वेल चे मालक आनंद कांतीलाल कोठारी यांचा द्वितीय चिरंजीव प्रेम हा बारावी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल अहिल्यानगर येथे शिकत असून त्यास ९२.८३ मार्क्स पडून तो उत्तीर्ण झाला आहे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
लहान पणापासून तो टेबल टेनिस या खेळात अग्रेसर आहे तसेच १ ली ते १० वी अहिल्यानगर येथील तक्षिला या शाळेत शिकला असून ११ वी ते १२ वी तो भाऊसाहेब फिरोदिया अहिल्यानगर या शाळे मध्ये शिकला त्याला सर्व शिक्षकाचे आणि वडील आनंद आई प्रीती यांचे मार्गदर्शन लाभले.
तो उत्तीर्ण झाल्याबद्दल कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी सर्व कोठारी परिवाराने त्याचे अभिनंदन केले