जामखेड प्रतिनिधी,
आ. रोहितदादा पवार यांच्या प्रयत्नाने “दादांचा काम बोलतय” या ट्रॅगलाईन खाली खर्डा येथील कौतुका नदीच्या नवीन पुलाचे लोकार्पण…
याबाबत माहिती अशी की, मागील वर्षी आमदार रोहित दादा पवार यांनी खर्डा व जामखेड येथील रस्ता व पुलाच्या कामासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन त्याचे उद्घाटनही केले होते. जामखेड येथील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दिनांक 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खर्डा येथील कौतुका नदीवरील पुलाचे उद्घाटन सेवा सोसायटीचे चेअरमन मुकुंद (आप्पा) गोलेकर यांच्या हस्ते करण्यात आले, “दादांचे काम बोलतय”या ट्रॅगलाईन खाली लोकार्पण सोहळा पार पडला, मोठ्या थाटामाटात झालेल्या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
खर्डा येथील शिर्डी- हैदराबाद या महामार्गावरील हा चार पदरी रस्ता ऐतिहासिक खर्डा किल्ला ते सिताराम बाबा गडाच्या पायथ्यापर्यंत पूर्ण करण्यात आला आहे, यामधील रस्ता दुभाजकाचेही काम पूर्ण झाले आहे,येथील अनेक वर्षांपूर्वी कौतुका नदीवरील जुना पूल दुरुस्त करण्याची मागणी होत होती त्याची दयनीय अवस्था झाली होती त्यामुळे या पुलाचेचे नवीन काम करणे गरजेचे होते, तात्काळ या कामी आमदार पवार यांनी रस्त्याबरोबर पूलाच्या कामासाठी ही निधी उपलब्ध केला व लगेच पुलाचे काम सुरू झाले तब्बल एक वर्षानंतर हे काम पूर्ण झाले होते. याबाबत येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून मोठ्या थाटामाटात पुलाचे उद्घाटन केले, यावेळी नवीन पुलाला नारळाच्या झाडांचे तोरण बांधण्यात आले, प्रत्येक खांबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा लावण्यात आला होता, डिजिटल बोर्ड द्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात येत होते तसेच डीजे साऊंड सिस्टिम वर राष्ट्रवादीचे गाणे वाजवण्यात येऊन फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली, त्यानंतर नारळ वाढवून पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो आमदार रोहित दादा पवार “तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” या प्रचंड घोषणा देण्यात आल्या.
या रस्त्याचे व नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे खर्डा शहरासाठी या कामाची नवीन ओळख निर्माण झाली आहे, पुढील काळात रस्त्याच्या दुभाजकांमध्ये झाडे व आकर्षक लाईटची व्यवस्था होणार असल्याने खर्डा शहराच्या वैभवात मोठी भर पडणार असल्याने आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नाने झालेल्या या कामाचे खर्डा व परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. खत्री कंट्रक्शन च्या माध्यमातून ज्या रस्त्याचे व पुलाचे काम करण्यात आले असून येथील इंजिनियर रणजीत खारतोडे यांनी विशेष लक्ष घालून या कामाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांचाही सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार, माजी उपसरपंच श्रीकांत लोखंडे, चंद्रकांत गोलेकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी भोसले, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, दादा जम कावळे, दीपक जावळे, अशोक खटावकर, कल्याण सुरवसे,शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे, सुनील साळुंखे, ओमसिंग भैसडे, डॉक्टर बिपिन लाड, हरिदास गोलेकर, सोसायटीचे संचालक सुहास पाटील, राजू जिकरे, कपिल लोंढे, सावता लोखंडे, राम ढेरे, संतोष लष्करे,नितीन गोलेकर, बबन मदने,अक्षय गोलेकर, आजिनाथ लटके, मोहन भोसले, गणेश ढगे, भीमा घोडेराव, सुरेश ढेरे,अवी सुरवसे, शत्रुघ्न गोलेकर, विकास शिंदे इत्यादी सह कार्यकर्ते व बहुसंख्येने खर्डा ग्रामस्थ उपस्थित होते.