रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील नगरपरिषद, बसस्थानकासह रखडलेल्या कामांची जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ यांनी पहाणी करत शासकीय दवाखान्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची केली सुचना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा सर्व खात्यांना कृती आराखडा करण्याचे निर्देश दिले. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ यांनी शुक्रवारी जामखेड शहरात सुरू असलेली प्रलंबित कामे यांचा आढावा घेत त्याबाबत सुचना व आदेश दिला.
त्यानुसार शासकीय दवाखाना जुनी, नवी इमारत, नूतन नगरपरिषद इमारत, बसस्थानक परिसरात पाहणी करून आढावा घेतला. शासकीय दवाखाना इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या त्यांनी सूचना केल्या.
इतर काही विकासात्मक कामासंदर्भात आराखडा करण्याचे निर्देश दिले. रखडलेले काम, त्रुटी या संदर्भात ठेकेदार, शाखा अभियंता यांना धारेवर धरले. बसस्थानकाचे रखडलेले काम, अस्वच्छता याबाबत आगार प्रमुखांनाही सूचना केल्या.
यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार, आदी उपस्थित होते.
शहरातील हाडकी परिसरात असलेली नगरपरिषद इमारत, वाचनालय, सभागृह याची पाहणी केली. तसेच समोरील असलेली नागेश्वर नदीचे – सुशोभीकरण करा, तुळजापूर जगदंबा देवीची पालखी या नदीतून जाते तेथे लोखंडी पूल बसवा, याचे अंदाजपत्रक तयार करून नगरोत्थानला सादर करा, असे निर्देश मुख्याधिकारी अजय साळवे यांना दिले. सध्याच्या सरकारी दवाखान्यासाठी सहा महिन्यांसाठी
यावेळी सुरक्षिततेबाबत अनेक त्रुटी आढळल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शांतीलाल लाड यांना सध्याच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा.
तसेच नियोजित उपजिल्हा 3 रुग्णालयाचा पहिला मजला सहा महिन्यांत झाला पाहिजे. त्या ठिकाणी शासकीय रुग्णालय चालू होईल, अशी व्यवस्था करा, अशा सूचना ठेकेदार, अधिकारी यांना दिल्या. भाडेकरारावर जागा पाहा, असे निर्देश दिले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास दोन वर्षे झाली तरी काम अपूर्ण आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा. तसेच शंभरदिवसीय मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी सालीमाठ यांनी घेऊन कामामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
दोन दिवसांत स्वच्छता करा
जिल्हाधिकारी यांनी रखडलेल्या बसस्थानकाची पाहणी केली. बसस्थानक डिझाईन व रखडलेले काम, परिसरातील दुर्दशा व प्रवाशांचे होणारे त्रास पाहून आगारप्रमुख प्रमोद जगताप व ठेकेदाराचा अभियंता यांनाही सूचना केल्या. दोन दिवसात स्वच्छता, शौचालय व स्वच्छतागृहासाठी व्यवस्था करण्याचे आदेश आगारप्रमुखांना दिले.
महामार्ग रखडला, नागरिक हैराण
शहरातील महामार्गाचे काम रखडल्याने नागरिक, व्यावसायिक हैराण झाले आहेत. विशेषतः बऱ्याच ठिकाणी काम अर्धवट स्थितीत असल्याने उडणारी धूळ त्रासाचे कारण ठरत आहे. रस्त्यावर खाचखळगे, फुफाटा आहे. यामुळे वाहनधारक, दुतर्फा राहणे नागरिक यांना सततच्या धुळीमुळे श्वसनाचे त्रास सुरू झाले आहेत.
खर्डा चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंतचे काहीच काम झालेले नाही. विश्वक्रांती चौक ते बैल बाजार प्रवेशद्वारापर्यंत एकच बाजू झालेली आहे. काम लवकरात लवकर सुरू व्हावे अशी मागणी नागरिकांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *