रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणास मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा,शुक्रवारी करणार रस्ता रोको आंदोलन

पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विरोधात उठवला लोकप्रतिनिधींनी आवाज

जामखेड प्रतिनिधी,

गेल्या सहा दिवसांपासून रत्नदीप कॉलेजच्या विरोधातील मागण्या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड चे पांडूराजे भोसले आमरण उपोषणास बसलेले आहेत व त्यांच्या समवेत शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

तरीही प्रशासन सुस्तच आहे. उपोषण कर्ते भोसले व काही विद्यार्थीनींची तब्येत खालावली आहे. तेव्हा उपोषण कर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास शुक्रवार दि. ५ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जामखेड येथील खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तसे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.

गेले सहा दिवस झाले तरी अद्याप पर्यंत सदरील मागण्यांविषयी विद्यापीठ किंवा प्रशासनाने उपोषण कर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपोषण स्थगित करण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचललेले नसल्याने व उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली असल्याने येत्या दोन दिवसात प्रशासनाने योग्य ती कारवाई करून उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या संदर्भात विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान न होता विद्यार्थ्यांच्या स्थलांतराणाविषयी तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा.

अन्यथा वार शुक्रवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता खर्डा चौक या ठिकाणी रस्ता रोको करून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत यादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.

गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे.
डॉक्टरांनी उपोषण कर्त्यांचे चेक केले असता पांडुरंग भोसले यांचे सहा दिवसाच्या उपोषणामुळे तीन किलो वजन घटले आहे व बिपी देखील कमी झाला असल्यामुळे चिंता व्यक्त केली व काळजी घेण्याची विनंती केली आहे.

जामखेड येथील रत्नदीप काॅलेज विरोधात तीन महिन्यांपुर्वी पांडुरंग भोसले व विद्यार्थ्यांनी नऊ दिवस उपोषण केले होते त्यावेळी मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच प्रशासनाने काॅलेज वर कारवाई व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यात येईल असे सांगितले होते परंतु तीन महिने झाले तरीही विद्यार्थ्यांचे स्थलांतर झालेले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पांडुरंग भोसले पुन्हा गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस आता मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी दि. ५ रोजी जामखेड शहरात खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

रत्नदीप विरोधात आमदार प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात आवाज उठवला आहे. आता मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *