रत्नदीप फौंडेशन विरोधात सुरू आसलेले विद्यार्थीचे आंदोलन व उपोषण अकराव्या दिवशी मागे.
जामखेड प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुरू आसलेल्या आंदोलनाच्या आनुशंगाने आ. निलेश लंके यांनी सांगितले की या संदर्भात
तिनही विद्यापीठांना कारवाई करण्या संदर्भात तातडीने आजच पत्र देणार आहे. यावर जर कारवाई झाली नाही तर विद्यार्थींन समवेत नगर येथे मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा आ. निलेश लंके यांनी दिला.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन चे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याच्या विरोधात सुरू ११ दिवसांपासून सुरू आसलेले विद्यार्थीचे आंदोलन व शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांचे उपोषण आज शुक्रवार दि १५ रोजी आ. निलेश लंके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळपाणी घेऊन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
आ. निलेश लंके, संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, आर पी आय जिल्हाअध्यक्ष सुनिल साळवे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, राजेंद्र कोठारी, रमेश आजबे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, हवा सरनोबत, शहाजी राळेभात, सनी सदाफुले, पवन राळेभात, डॉ. भरत दारकुंडे, सचिन देशमुख, प्रशांत राळेभात, विजय राळेभात, भाऊ पोटफोडे, भाऊ म्हेत्रे, गणेश जोशी, आकाश घागरे, राजेंद्र गोरे प्रफुल सोळंकी, शुभम हजारे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या अकरा दिवसांपासून रत्नदीप मेडिकल कॉलेज विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज दि. १५ रोजी नाशिक आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू कानेटकर यांनी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे विद्यार्थी व विद्यार्थीनींशी संवाद साधला सदरचा प्रकार गंभीर आहे.
याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देऊ. विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्म भरुन घेतले जातील असे अश्वासन देत असताना कॉलेज बंद करण्यासाठी आमचा शंभर प्रयत्न आहे. या संदर्भात शासनाला अहवाल पाठवण्यात येणार आहे. हे एक युद्ध आहे लवकरच विद्यार्थींचे समायोजन करण्यासाठी शासनाकडे मागणी करु असे अश्वासन विद्यार्थींना दिले.
यावेळी पुणे विद्यापीठाच्या कमीटीतील डॉ. प्रमोद पाटील, गणेश दामा, डॉ. निरज व्यवहारे, डॉ. सुनिल अमृतकर, कीरण भीसे व अविनाश फलके यांनी विद्यार्थींचे प्रश्न सोडवण्यासाठी आले असता यावेळी नोडल अधिकारी प्रा. फलके यांनी सांगितले की विद्यापीठाच्या आदेशानुसार मुलांचे परीक्षा फॉर्म भरुन घेणे, जवळचे परीक्षा सेंटर मिळण्याबाबत काम करणे, क्रश कोर्स घेणे, कमीटी बरोबर संवाद साधुन परीक्षा संबधित विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे यासाठी काम करणार आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विद्यापीठ मुंबईचे ज्योत्स्ना बुधगावकर सचिन जाधव यांच्या कमीटीने विद्यार्थींच्या भावना जाणून घेतल्या या वेळी त्यांनी सांगितले की रत्नदीप मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द करण्यासाठी चा अहवाल देण्यास येणार आहे.
यावेळी तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले की आपल्या बहुसंख्य मागण्या विद्यापीठ स्तरावर अहवालाच्या अनुशंगाने विद्यार्थींच्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्यामुळे आपण आंदोलन व उपोषण मागे घ्यावे जेणे करून आपणास परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना निवास व भोजन संदर्भात अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
आंदोलन स्थगित पण कारवाई झाली नाहीतर पुन्हा आंदोलन करणार – पांडुरंग भोसले
गेल्या 10 दिवसात पासून सुरू असलेले रत्नदीप विरोधातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या बाबत आंदोलन सुरू होते या मागण्या पैकी काही मागण्या मान्य झाल्या असून काही मागण्या प्रलंबित आहेत त्या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे आंदोलनकर्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले यांनी यावेळी सांगितले.