खामगांव /वंजारवाडी येथील वैभव मिसाळ या विद्यार्थ्यांची भोपाळ येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स रिसर्च सेंटर येथे निवड
बाजार समितीच्या वतीने करण्यात आला सत्कार
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी (धानोरा) येथील वैभव बाळासाहेब मिसाळ या विद्यार्थ्यांची भोपाळ येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स रिसर्च सेंटर येथे संशोधन (शास्त्रज्ञ) होण्याचे शिक्षण घेण्यासाठी निवड झाल्याने जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती दालनात सत्कार करण्यात आला.
केंद्र सरकारच्या वतीने शास्त्रज्ञ होण्यासाठी असणारी IAT परीक्षा पार पडली. नुकताच सदर परिक्षेचा निकाल लागून त्यामधे वैभव बाळासाहेब मिसाळ या विद्यार्थ्यांची INDIAN INSTITUTE OF SCIENCE RESEARCH CENTRE,Bhopal याठिकाणी पुढील शिक्षणासाठी निवड झालेबद्दल वैभव बाळासाहेब मिसाळ या विद्यार्थ्याची तालूक्यातील विविध ठिकाणी सत्कार करण्यात येत असून आज दि. ३१ जुलै रोजी जामखेड येथील छ. शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या हस्ते वैभव मिसाळ यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे संचालक डॉ. गणेश जगताप, संचालक राहुल बेदमुथ्या, सदर विद्यार्थ्याचे पालक बाळासाहेब मिसाळ, भाजपा युवा मोर्चा भटक्या विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब फुलमाळी, शिवकुमार डोंगरे, बाळासाहेब मिसाळ, राजेंद्र सांगळे, तुषार बोथरा आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच माजीमंत्री आमदार, प्रा. राम शिंदे यांचेसह समाजातील विविध स्तरातील मान्यवरांकडून वैभव मिसाळ या विद्यार्थ्याचे अभिनंदन होत आहे.