प्रा.सचिन सर गायवळ यांच्यावतीने आषाढीवारी निमित्ताने (धाकटी पंढरी) धनेगाव येथे जाण्यासाठी खर्डा व नान्नज येथून भाविकांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध.. भाविक भक्तांनी दर्शन घेण्यासाठी बससेवेचा लाभ घेण्याचे मित्र मंडळाच्या वतीने आवाहन …
जामखेड प्रतिनिधी,
समाज सेवेच्या माध्यमातून लोकांना उपयुक्त असे अनेक उपक्रम राबविणारे प्रा. सचिन सर गायवळ यांनी मागील वर्षीपासून आषाढी एकादशीच्या निमित्ताने खर्डा व परिसरातून (धाकटी पंढरी) धनेगाव येथील पांडुरंगाच्या दर्शनासाठी लक्झरी बससेवा भाविक भक्तांसाठी सुरू केली आहे. यावर दिनांक 17 जुलै 2024 रोजी त्यांनी खर्डा येथून 4 बससेवा तर नान्नज येथून 2 बस सेवेच्या माध्यमातून महिला, मुले, मुली व वयस्कर लोकांसाठी धनेगाव येथील धाकटी पंढरी समजले जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी एकूण 6 बससेवा लक्झरी भाविकांसाठी मोफत उपलब्ध करून दिल्या आहे.
पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त पायी दिंडी व इतर वाहनाच्या माध्यमातून दर्शनासाठी जात असतात व दर्शन करून आपली मनोकामना पूर्ण करतात,परंतु असंख्य भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही अशा भाविकांसाठी धनेगाव येथील (धाकटी पंढरी) येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जामखेड तालुक्यासह मराठवाडा व अनेक जिल्ह्यातून भाविक भक्त आषाढी एकादशीच्या दिवशी धनेगाव येथे दर्शनासाठी येत असतात.
एकादशीच्या दिवशी गर्दीमुळे अनेकांना दर्शन घेण्यासाठी व येथे जाण्यासाठी व वाहनांची अडचण लक्षात घेता प्रा. सचिन सर गायवळ यांनी खर्डा, नान्नज येथून लक्झरी बससेवा भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे महिला व वयस्कर लोकांना आषाढी वारीच्या निमित्ताने सुखकर प्रवास मागील वर्षीपासून अनुभवास मिळत आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी सचिन सर गायवळ यांचे मनापासून आभार यापूर्वीच व्यक्त केले आहेत. हा उपक्रम दरवर्षी राबविला जाणार मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या मोफत बससेवेचा लाभ जामखेड तालुक्यासह खर्डा व नान्नज परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.सचिन सर गायवळ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट
प्रा.सचिन सर हे गणपती उत्सव असो या नवरात्र उत्सव तसेच सामाजिक उपक्रम राबवत असताना दुष्काळात पाण्याचे टँकर, कोरोना काळात गोरगरिबांना औषधोपचार, भाजीपाला व किराणा वाटप करून त्यांनी अनेक उपक्रमातून लोकांसाठी समाज सेवा केली आहे त्याचबरोबर धार्मिक कामातही त्यांनी तरुण मंडळांना सहकार्य करून आपला सहभाग नोंदविला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी खर्डा व नान्नज येथे बससेवा दिल्यामुळे भाविक भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.