न्यायधीश व्ही व्ही जोशी यांच्या हस्ते संर्घष मित्र मंडळाच्या गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना
जामखेड प्रतिनिधी
आपल्या लाडक्या गणरायाचं आज आगमन झालं असल्याने सर्वत्र अगदी उत्साहाचं वातावरण आहे.दुपारी ३ वाजेनंतर पावसानेही जोरदार हजेरी लावून गणरायाचे स्वागत केले. अनेक दिवसापासून पाऊस गायब झाल्यामुळे चिंता वाढली होती. पण गणपती बाप्पा आपल्यासोबत रुसलेल्या वरुणराजालाही घेऊन आल्याने भक्तांचा आनंद द्विगुणीत झाला.शहरातील प्रतिष्ठित व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोर्ट रोड येथील संघर्ष मित्र मंडळाच्या गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना जामखेड दिवाणी न्यायालयाचे न्यायधीश व्ही व्ही जोशी, यांच्या हस्ते करण्यात आली
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात व अतिशय उत्साहाच्या वातावरणात येथे लाडक्या गणरायाचे आगमन झाले. लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी सकाळपासूनच आबाल वृद्धांची लगबग सुरू होती. सजावटीचे व पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची झुंबड उडाली होती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात गणेशमूर्ती घरी नेल्या. बाळगोपालांचा उत्साह पाहण्यासारखा होता. अतिशय उत्साहाच्या व मंगलमय वातावरणात दुपारपर्यंत घरोघरी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
येथील संघर्ष मित्र मंडळ गणेशोत्सवाचे ४० वे वर्ष असून मंडळाला जिल्हा पोलीस दल,तहसील कार्यालय यासह विविध पुरस्कार मिळेल असून सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर ठरलेल्या मंडळाने आष्टी येथून आणलेल्या सुबक अशी गणेश मूर्तीची जयहिंद चौक येथून ढोल ताशा पथकासमवेत वाजतगाजत मिरवणूक काढून सायंकाळी ५ वाजता जामखेड दिवाणी न्यायालयाचे न्यायधीश व्ही व्ही जोशी,यांच्या हस्ते विधीवत पूजा करून गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली.यावेळी मंडळाचे चंद्रकांत राळेभात,उपाध्यक्ष कुंडल औचरे,ओंकार दळवी,चेतन राळेभात पराग शिंदे,अनिल लोहकरे,संतोष निमोणकर,अमित भंडारी दत्ता चव्हाण, आनंद गांधी अमोल चिंतामणी,दीपक ढोले संजय फुटाणे,दीपक पवार,विनोद लोळगे,अशोक हुलगुंडे,अॅड , अॅड संग्राम पोले .,अॅड नितीन घुमरे,अॅड गोले,अॅड गायकवाड,कामिल शेख पत्रकार समीर शेख,लियाकत शेख प्रा धनंजय भोसले. आण्णासाहेब भोसले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने होते,यावेळी पत्रकार व मंडळाचे ओंकार दळवी यांनी न्यायधीश व्ही व्ही जोशी,यांना मंडळाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
संर्घष मित्र मंडळाची उत्सवाची परंपरा ●
येथील संर्घष मित्र मंडळाची सण उत्सव साजरे करण्याची एक वेगळी परंपरा आहे. मंडळाला या वर्षी ४१ वर्ष पूर्ण होऊन ४२ व्या वर्षात मंडळाने पर्दापण केले आहे,गणपती ची स्थापना करून गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी,होळी, शिवजयंती सण उत्सव परंपरागत पणे साजरे करून विविध सामाजिक उपक्रमात मंडळ नेहमी अग्रेसर राहिले आहे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,