सामाजिक कार्यकर्ते व कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांना जैन श्रावक संघ कोल्हार यांच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते व कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांना जैन श्रावक संघ कोल्हार यांनी यंदाचा राज्यस्तरीय *समाज रत्न पुरस्कार* उदोगपती प्रकाश धाडीवाल यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना धाडीवाल यांनी कोठारी यांच्या कार्याचा माहिती देतांना सांगितले की
गेली ३५ वर्षापासून प्रत्येक क्षेत्रात समाजसेवा करणारे आणि जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले आहे तसेच
देहदान, अवयदान, रक्तदान, कोरोना काळामध्ये उल्लेखनीय कार्य केले, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि व या पुस्तके वाटप असे अनेक
सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे हे सर्व ते मोफत करत आहेत आज खर्या अर्थाने अशा व्यक्तीची समाजाला गरज आहे असे व्यक्तव्य प्रकाश धाडीवाल यांनी केले.
यावेळी समाज हिताचे काम करणाऱ्या इतर चार जणांना सुद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले असून त्या मध्ये बाळासाहेब धोका पुणे यांना समाजशिल्पी पुरस्कार ,अजित कुंकूळोळ कोल्हार यांना समाज शिरोमणि पुरस्कार,गणेश निबे कोल्हार (पुणे )यांना युवा समाज गौरव पुरस्कार, करण राका कोल्हार (मुंबई) यांना युवा समाज रत्न पुरस्कार देण्यात आले आहे.कोल्हार येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या स्थानकामध्ये प. पू. श्री चंदनबालाजी म.सा. आणि प. पू. श्री पद्मावतीजी म.सा आदि ठाणा ७ आणि प. पू. श्री कैवल्यरत्नाजी म. सा. आधी ठाणा यांच्या उपस्थित ६५ दिवसीय छंद आराधना शिखर महोत्सव या स्वर्णीय कार्यक्रमा दरम्यान पुरस्काराचे वितरण झाले आहे अशी माहिती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नंदलाल भटेवरा यांनी दिली.
यावेळी बोलताना जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नंदलाल भटेवरा आज कोल्हार शहरामध्ये दुग्धशर्करा योग आहे पैसटीया जाप चा समाप्ती समारोह आणि समाजात काही सामाजिक का उल्लेखनीय कार्य करणारे पाच सत्कारमूर्ती यांचं कार्य मी डोळ्यांनी पाहिले आहे म्हणून त्यांना गौरवून बाकीच्या युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी या पुरस्काराचे वितरण महासतीजी परमपूज्य चंदनबालाजी महाराज आणि परमपूज्य पद्मावतीजी महाराज यांच्या विचाराने हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
या कार्यक्रमा वेळी रमनलाल लुंकड पुणे, पारसमल मोदी मुंबई, अशोक पगारिया कासरवाडी, सुनील बाफना घोडनदी, प्रशांत बाफना बेंगलोर ,ललित मोदी नाशिक , दिलीप राका नागपूर ,सागर साकला भोसरी, राजेंद्र पिपाडा,शशिकांत कर्नावट मालेगाव, अजित सुराणा डॉ. सुवर्णाजी गोलेचा राहुरी, चंद्रशेखर लुंकड वाघोली ,बाबूसेठ( सतीश )लोढा अहिल्यानगर, राजेंद्र बैद वर्धमान नगर ,भरत चोरडिया घोडनदी, विजय लोढा शिर्डी ,राजेंद्र भन्साळी राहता ,नरेंद्र बाफना अहिल्या नगर , निखिल लोढा अहिल्यानगर,
कांतीलाल कोठारी जामखेड ,अनिल पिपाडा राहता ,प्रेमचंद भंडारी कोपरगाव, सुवालाल लुंकड़ बेलापूर, सुमतीलाल गांधी आश्वी ,सुनील बोथरा वांबोरी , चंदनमल सुरणा राहुरी, राजेंद्र बोरा आणि लोणी प्रवरा ,वसंतलाल फिरोदिया संगमनेर, सुरेश भंडारी राहुरी फॅक्टरी, अमित लोढा सोनगाव,कांतीलाल कोठारी जामखेड ,अनिल पिपाडा राहता ,प्रेमचंद भंडारी कोपरगाव, सुवालाल लुंकड़ बेलापूर, सुमतीलाल गांधी आश्वी ,सुनील बोथरा वांबोरी , चंदनमल सुरणा राहुरी, राजेंद्र बोरा लोणी प्रवरा ,वसंतलाल फिरोदिया संगमनेर, सुरेश भंडारी राहुरी फॅक्टरी, अमित लोढा सोनगाव ,शिरीष दरडा संगमनेर ,संतोष मुथा देवळाली प्रवरा ,राजेंद्र गादिया बाबळेश्वर, सुभाष भळगट, कांतीलाल भळगट , आसराज बोथरा, संजय बोरा, सुमित चानोदिया, संजय छाजेड, संजय बोरा,सुभाष भंडारी, सतीश टाटिया,हे सर्व प्रतिष्ठित उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आले होते.