संजय कोठारी यांच्या वतीने इंदापुर तालुक्यातील तक्रारवाडी येथील युवक अभिजित काळंगे यास वृक्ष लागवडीस 200 वृक्षाची मदत
जामखेड प्रतिनिधी,
नेहमी सामाजिक कार्याबरोबरच वृक्ष लागवड करून त्यांना जोपासण्याचा छंद असणारे जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांच्या या कार्याचा उल्लेख नेहमी महाराष्ट्र भर होत असतानाच इंदापुर जि पुणे येथील वृक्ष प्रेमी युवक अभिजित काळंगे यास संजय कोठारी यांच्या सामाजिक व वृक्ष लागवड कामा संदर्भातील माहिती जामखेड येथील युवक मित्र गणेश देवकाते यांच्या माध्यमातुन मिळाल्याने अभिजित काळंगे यांनी संजय कोठारी यांना फोनवरून बोलून वृक्ष लागवडी साठी रोपाची मागणी केली असता कोठारी यांनी त्यास होकार देत 200 रोपे देण्याचे कबुल करत अभिजित काळंगे यास 200 वृक्षाची रोपे दिली.
असून ती सर्व रोप अभिजितने जेसीबी मशीनच्या साह्याने खड्डे घेऊन इदापुर तालुक्यातील भिगवण जवळील आपल्या तक्रारवाडीत लावण्याचे काम केले आहे या अगोदर हि कोठारी यांनी बरीच झाडे लावत त्यांचे संगोपन केले आहे तसेच कोठारी यांनी मागील आठवड्यात 100 मोहा आणि सौताडा घाट माथ्यावर शेकडो वृक्षाची लागवड केल्याची घटना ताजी असतानाच आता तक्रारवाडी जिल्हा पुणे येथील युवकाच्या वृक्ष लागवड प्रेमापोटी 200 झाडाची रोपे देऊन एक नवा उचांक केल्या चे स्पष्ट होत आहे.
त्याच बरोबर मानवी गरजा व विकृती मुळे बऱ्याच प्रमाणात वृक्षतोड होत असताना पर्जन्य मानावर त्याचा मोठा परिणाम दिसून येत असुन दुष्काळ जन्य परिस्थीती निर्माण झाल्याने वृक्षतोड वृक्षारोपण करून वृक्षाचे संगोपन करणे हि काळाची खरी गरज असल्याने आपण गेली 30-35 वर्षापासून वृक्षारोपण करत आहोत आणि आपण प्रत्येकाने हि किमान एक तरी झाड लावुन समाज कार्य करत निसर्गाचा ऱ्हास थाबवला पाहीजे असे आव्हाहन संजय कोठारी यांच्या वतीने उपस्थित प्रसगी करण्यात आले.