जामखेड येथे झालेल्या “राजा शिवछत्रपती” महानाट्यास उदंड प्रतिसाद

शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने आयोजित केले होते महानाट्य

जामखेड प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत शिवचरित्रावर अधारीत जामखेड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने दि १८ रोजी सादर झालेल्या ऐतिहासिक महानाट्याला नागरीकांनी प्रचंड गर्दी करत प्रतिसाद दिला. या भव्य दिव्य महानाट्यातील आनेक प्रसंग अंगावर शहारे आणणारे होते. विशेष म्हणजे स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या या ऐतिहासिक महानाट्याचे सर्वत्र कैतुक होत आहे.

 


शिवरायांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला होण्यासाठी व त्यांच्या विचारांची आजही समाज्याला गरज असल्याने तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती जनसामान्यांनपर्यंत पोहोचवण्यासाठी या राजा शिवछत्रपती महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या महानाट्यात महाराष्ट्राच्या संस्कृती बरोबरच शिवजन्मोत्सव सोहळा, स्वराज्याची शपथ, शासन कसे असावे म्हणून रांज्याच्या पाटलाला करण्यात आलेल्या शिक्षेचा प्रसंग, खाजगी सावकारकी मोडीत काढण्यासाठी महाराजांनी स्वतःच्या मामाला केलेले कडक शासन व गोरगरीब रयतेला सावकारकीच्या जाचातून मुक्त केले. एकापाठोपाठ एक आसे आनेक संकटे स्वराज्यावर चालुन आले होते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावर कशी मात करून स्वराज्य निर्माण केले हे या महानाट्यात दाखवण्यात आले आहे.

 

विषेश म्हणजे अफजल खानचा वध ,पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंड व शाहीस्ते खानावरील हल्ला असे अनेक अंगावर शहारे आणणारे प्रसंग या महानाट्यात दाखवण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचा समारोप हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाने, फटाक्यांच्या आतिषबाजी व डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या विद्युत रोषणाईने नेत्रदीपक झाला.

कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थी युवक युवती महीला ,पुरुष व वयोवृद्ध अशा अशा सर्व वयोगटातील शिवप्रेमींनी महानाट्य पाहत शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार झाले होते. विशेष म्हणजे या राजा शिवछत्रपती महानाट्यामध्ये जामखेड शहरासह तालुक्यातील १०० स्थानिक कलाकारांनी सहभाग घेऊन हे नाटक बसवले होते. नाटक यशस्वी करण्यासाठी शिवराज्याभिषेक उत्सव समिती जामखेड च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खास परीश्रम घेतले होते.

१) चौकट

इतिहासाचा जागर ग्रामीण भागातील तरुण कलाकारांपर्यंत गेला पाहिजे आणि यातून देशभक्ती निर्माण होतील
किंवा त्यांनाही शिकता येईल या निमित्ताने हे महानाट्य सादर केले होते. तसं पाहिलं तर यातील सर्व कलाकार हे ग्रामीण भागातले असून सुद्धा फक्त छत्रपतीच्या इतिहासा मुळेच हे एवढे सुंदर झाले असं आमच्या निदर्शनास आले. परंतु या करण्यामागचा उद्देश एवढाच होता की या मातीत सुद्धा अतिशय सुंदर कलाकार आहेत आणि त्यांच्या कलेला वाव मिळाला पाहिजे याच उद्देशाने हे महानाट्य पुढे चालु ठेवण्याचा प्रयत्न आहे.

(गुलाब जांभळे, महानाट्य लेखक व निर्माते)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावरील आनेक महानाट्यात काम केले आहे. एकांकिका स्पर्धामध्ये देखील जामखेड येथील कलाकार घेऊन काम करत असतो. त्यामुळे आपल्या मातीतील स्थानिक कलाकारांन घेऊन या राजा शिवछत्रपती महानाट्या मध्ये आम्ही जामखेड मधिल कलाकार काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावरील ऐतिहासिक महानाट्यात काम करताना एक वेगळी उर्जा मिळते. या महानाट्यामुळे स्थानिक कलाकारांना संधी मिळाली आहे.

(अविनाश बोधले, कलाकार, जामखेड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *