सोनेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अखेर मिळाले एमबीबीएस डॉक्टर व कर्मचारी

प्रा. सचिन सर गायवळ यांच्या पाठपुराव्याला आले यश..

(जामखेड प्रतिनिधी)

याबाबत माहिती अशी की आमदार राम शिंदे यांनी सोनेगाव व खर्डा येथे भव्य असे प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत व कर्मचारी निवासासाठी 12 कोटी रुपये मंजूर केले होते, परंतु गेली पाच वर्षापासून या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राला अधिकृत डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा स्टॉफ मिळत नव्हता. एवढ्या मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधून सुद्धा गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा मिळत नव्हती. त्यांना खाजगी डॉक्टर शिवाय पर्याय राहिला नव्हता त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.

याबाबत सोनगावचे भूमिपुत्र प्रा. सचिन सर गायवळ सोनेगावचे सरपंच डॉ. विशाल वायकर, तरडगावचे सरपंच डॉ. जयराम खोत, माजी सरपंच पद्माकर बिरंगळ,धनेगावचे मा. सरपंच महेश काळे, जवळका सरपंच सुभाष माने पिंपळगाव उंडा सरपंच गणेश जगताप यांनी आमदार राम शिंदे यांच्याकडे सोनेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मिळावेत व प्रा.आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.

त्यांच्या या  मागणीची आमदार राम शिंदे यांनी दखल घेऊन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली त्यानंतर प्रत्यक्षात सोनेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन एमबीबीएस डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्टॉफ मिळाला.
सोनेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एमबीबीएस डॉक्टर ज्योती पांडुळे डॉ.कांबळे यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याबरोबर आरोग्य कर्मचारी,डॉ.आमले डॉ. वडमोरे डॉ. खाडे या सर्वांचा सत्कार सोनेगावचे गावचे सरपंच डॉ.विशाल वायकर व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गेली अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर समाजसेवक प्रा.सचिन सर गायवळ यांच्या पाठपुरावाला यश आले असून या नवीन बांधलेल्या मोठ्या इमारतीत गोरगरीब जनतेला सोनेगाव शहर व परिसरातील नागरिकांना अल्प दरात शासकीय आरोग्य सेवा मिळणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास मिसाळ, विकास भोसले, उपसरपंच लखन मिसाळ ग्रामसेवक सचिन गदादे, संजय गायकवाड, शिवाजी ढाळे, डॉ. गणेश जाधव, घनश्याम ढाळे, अतुल बिरंगळ,सुशांत वायकर,दत्ता जाधव,उमेश वायकर, विशाल कांबळे सह सोनेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
खर्डा येथे नवीन बांधलेल्या सहा कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मिळावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे,परंतु आरोग्य विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस डॉक्टर आरोग्य कर्मचारी कधी मिळणार व नवीन प्रा.आरोग्य केंद्र केव्हा सुरू होणार याबाबत खर्डा ग्रामस्थ प्रतीक्षेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *