कै.विष्णू उस्ताद काशीद आखाडा ठरतोय नागपंचमी ची ओळख बदलवणारा महाराष्ट्रातील आखाडा…

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड ची पंचमी म्हणल की भल्या भल्याना भुरळ घालतो तो घुंगरांचा आवाज. अस म्हणल् जात की घुंगराचा आवाज आल्याशिवाय पाऊस ही पडत नाही , आणि अश्याच महाराष्ट्रात नावाजलेल्या जामखेडची नागपंचमी आता युवा पिढीतील एक आदर्श की ज्या युवा न आजची पिढी लाल मातिकडे कशी वळवता येईल यासाठी गेली 22 वर्ष प्रयत्न करत आहे तो युवा म्हणजे अजय विष्णू काशीद.

सालाबादप्रमाणे 22 व्या वर्षी ही जामखेड मधे नागपंचमी निमित भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे मैदान कै. विष्णू उस्ताद काशीद यांच्या स्मरणार्थ अजय दादा काशीद यांच्या पुढाकाराने मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप महाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या अनुभवतून हे मैदान शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी जामखेड महविद्यालय जामखेड येथे संपन्न होत आहे.

यावर्षी या आखड्यासाठी प.पू.महामंडलेश्वर श्री श्री 1008 इश्र्वरानंद ब्रह्मचारीजी महाराज श्री उत्तम स्वामी जी इंदौ र हे खास इंदौ र मध्यप्रदेश या ठिकाणावरून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर श्री क्षेत्रअश्वलिंग संस्थान पिंपळ वंडी चे ह भ.प.महादेवानंद भारती महाराज, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य राम शिंदे, सुरेश धस, माजी खासदार सुजय विखे, आमदार बाळासाहेब आजबे, डी वाय एस पी राहुल आवारे, माजी राज्यमंत्री रविकांत तुपकरआदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य आखाडा रंगतदार होणार आहे.

या वर्षी या आखड्याच वैशिठ्य म्हणजे पहिली मानाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उप महाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे यांच्यात रंगणार आहे.दुसरी कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन महारुद्र कालेलआणि उत्तर महाराष्ट्र केसरी सुदर्शन कोतकर यांच्यात हा थरार होणार आहे या सोबतच अनेक रोमहर्षक कुस्त्यांचे थरार या ठिकाणी जामखेड करणा पाहायला मिळणार आहेत.
दरवर्षी आयोजक कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठान च्या माध्यमातून या आखड्या सोबतच एक सामाजिक उपक्रम राबवला जातो या वर्षी ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून मल्लखांब खेळाडूचे प्रात्यक्षिक आणि त्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे हे या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणावे लागेल.
नागपंचमी च्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सखरोबा च्य दिवशी आखड्याचा हा रंगतदार सोहळा पार पडत असून महाराष्ट्र बाहेरील पैलवान याठिकाणी हजेरी लावतात म्हणून या आखद्यालां एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.सर्व कुस्त्या या सकाळी 9 ते 12 याच वेळेस नेमल्या जाणार आहेत त्यामुळे सर्व मल्लांनी वेळेत हजर राहून आपली कुस्ती नोंदून घ्यावी.आपणही सर्वांनी या आखड्यास उपस्तिथ राहून मल्लांना प्रोसहित करावे असे आवाहन आयोजक सारोळा गावचे सरपंच भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *