मोहा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन २०२२-२३ ते २०२७-२८ सालाकरिताची निवडणुक तसेच चेअरमन व व्हा.चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देवीचंद डोंगरे,शिवाजी डोंगरे, भीमराव कापसे, ज्ञानदेव बांगर,वामन डोंगरे,पंडित गायकवाड,तुकाराम चौधरी,तुकाराम डोके,पांडुरंग देडे, उत्तम गायकवाड,मारुती डोंगरे,मारुती बेलेकर,गोरख चौधरी,विकास सांगळे,विनोद इंगळे यांनी सहकार्य केले
मोहा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची मागील ५ वर्षापासून बँक पातळीवर १०० % वसुली होत आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत या संस्थेच्या ८२ सभासदांना ४०६४३५४/- रकमेची कर्जमाफी मिळाली असून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या १४९ सभासदांना ५३७५८७५/- प्रोत्साहन रक्कम मिळालेली आहे.
नवनिर्वाचित संचालक – संभाजी रामभाऊ चौधरी, महादेव सूर्यभान देडे, रावसाहेब एकनाथ रेडे, भाऊसाहेब मच्छिंद्र अडाले, बाबासाहेब आश्रू इंगळे, किसन बापू देडे, महादेव आश्रू रेडे, भास्कर बापू बांगर, सुशिला बाबासाहेब डोंगरे, आशाबाई शहाजी रेडे, अमोल जगन्नाथ राळेभात, महादेव साहेबराव बांगर, सुदाम दशरथ नवगिरे या नवनिर्वाचित संचालकांनी मोहा संस्थेच्या चेअरमनपदी महादेव सूर्यभान देडे तर व्हा.चेअरमनपदी महादेव साहेबराव बांगर सर यांची बिनविरोध निवड केली आहे.
चेअरमन, व्हा.चेअरमन तसेच सर्व संचालकांचा सत्कार अहमदनगर जिल्हा बँकेच्या सभागृहात बँकेचे संचालक श्री. अमोल जगन्नाथ राळेभात साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.मधुकर आबा राळेभात तसेच श्री. सुधीर दादा राळेभात यांच्या हस्ते करण्यात आला.