Featured News
Posts Slider
Health
आ.पवार यांनी श्रीमती हेमलता निकम यांच्या चहा व्यवसायाला दिली भेट…
आमदार रोहित दादा पवार यांनी खर्डा येथील कै. बाळू निकम यांच्या मुलीच्या शिक्षणाची फी भरून दिला मदतीचा हात..
आ.पवार यांनी श्रीमती हेमलता निकम यांच्या चहा व्यवसायाला दिली भेट…
जामखेड प्रतिनिधी,
खर्डा येथील चहाचा व्यवसाय करणाऱ्या श्रीमती हेमलता निकम या विधवा महिलेच्या चहा टपरीला आमदार रोहित दादा पवार यांनी भेट देऊन पतीच्या अपघाती मृत्यूची सहानभूतीपूर्वक चौकशी करून इंजिनिअरिंगला शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या शैक्षणिक वर्षाची 46 हजार रुपये फी देऊन मदतीचा हात दिल्याने उपस्थितांमध्ये भावूक वातावरण निर्माण झाले.
याबाबत माहिती अशी की, आमदार रोहित दादा पवार हे खर्डा येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला आले असता त्यांनी खर्डा पोलीस स्टेशनसमोर श्रीमती हेमलता निकम या विधवा महिलेने सुरू केलेल्या चहाच्या व्यवसायाला भेट दिली असता, श्रीमती निकम यांनी बोलताना सांगितले की, माझे पती बाळासाहेब निकम हे प्रसिध्द अशा चहाचा व्यवसाय करीत होते त्यांना मोटरसायकलची धडक दिल्याने त्यांना जखमी अवस्थेत नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु मोठा आर्थिक खर्च होऊनही त्यांचा कमी वयात दुर्दैवी मृत्यू झाला. पुढे माझ्या जीवनात मोठा अंधकार पसरला होता
एक मुलगी इंजिनिअरिंगला शिक्षण घेत होती, तर मुलगा शालेय शिक्षण घेत असताना कुटुंब चालवणे व मुलांचे शिक्षण कसे पूर्ण होणार अशा दुहेरी मनस्थितीत असताना मी जिद्दीने पुन्हा स्व. पती बाळू निकम यांनी चालवलेला चहाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये कसेतरी प्रपंच भागवून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी कष्ट घेत आहे. यासाठी त्यांनी मुलगी कु. ईश्वरी निकम ही उस्मानाबाद येथील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला शिक्षण घेत आहे तिच्या यावर्षाची शैक्षणिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याचे त्यांनी आमदार रोहित पवार यांना सांगितले या महिलेची ही व्यथा ऐकून आमदार पवार भावनिक झाले त्यांनी लागलीच संपूर्ण वर्षाची 46 हजार रुपये शैक्षणिक फी स्वतः मदत म्हणून देण्याचे त्यांनी कबूल केले तसेच कु.ईशा निकम हिचे शैक्षणिक शिक्षण व इंजिनियर पदवी पूर्ण झाल्यावर तिला नोकरी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले त्यामुळे उपस्थित कार्यकर्तेही भावुक झाले.
आमदार रोहित दादा पवार यांनी यापूर्वी ही पोतेवाडीच्या सौ. सुनिता बापू पोते या महिलेच्या फलटण येथे डॉक्टर हेमंत मगर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ऑपरेशन साठी एक लाख रुपयांची मदत करून याही गरीब कुटुंबाला मदतीचा हात दिला होता.
अशा अनेक संकट समयी आमदार रोहित पवार हे वेळोवेळी गरीब गरजू कुटुंबाच्या मदतीला धावून जातात तसेच त्यांनी आतापर्यंत हजारो लोकांच्या विविध आजारांचे ऑपरेशनही त्यांच्या यंत्रणेच्या मदतीने केली आहेत. त्यांनी खर्डा येथील निकम कुटुंबाला शैक्षणिक फी भरून मदतीचा हात दिल्याने त्यांच्या दातृत्वाची चर्चा मात्र सगळीकडे होताना दिसून येत होती.
ही भेट घडवून आणण्यासाठी पत्रकार दत्तराज पवार यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर,ग्रामपंचायत सदस्य दादा जमकावळे, प्रकाश गोलेकर,श्रीकांत लोखंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे कल्याण सुरवसे, राजुभाई सय्यद,राजू लोंढे इत्यादी उपस्थित होते.
Economy
food processing unit अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी
food processing unit सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच नविन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत उद्योग उभारण्यासाठी वैयक्तिक व गटासाठी १० लक्ष रुपये अनुदान तर कोणत्याही गट किंवा कंपनीला सामाईक पायभुत सुविधांच्या (CSC) उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तित जास्त ३ कोटी पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १७५ लाभर्थ्यांना ५ कोटी रुपये कर्ज मंजुर करण्यात आले असुन काही उद्योगही उत्तम प्रकारे सुरु झाले आहेत.
वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी, यांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
सुक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगाना लाभ (सामाईक पायाभुत सुविधा)
शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
मार्केटींग व ब्रॅंडिंग यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात आलेली आहे.
बीज भांडवलग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी खरेदी करण्यासाठी व खेड ते भांडवल म्हणून प्रत्येक सदस्य कमाल चाळीस हजार रुपये व स्वयंसहाय्यता गटाला कमाल चार लाख रुपये देण्यात येते.
काय आहे योजनेचा उद्देश?
अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पतमर्यादा वाढवून उत्पादनांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, सामाईक प्रक्रियासुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्मउद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे हेप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश आहे.
कोठे संपर्क करावा
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठीइच्छुकांनी केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयांशी संपर्क साधता येईल.
कोणते अन्नप्रक्रिया उद्योग
दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप,
लस्सी.
■ मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला,मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.
■ पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सिताफळ, पेरु, सफरचंद, आवळा,मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासून प्रक्रिया उद्योग, जाम, जेली,
आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट
प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रॅंडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.
■ तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व
प्रकारची तेल उत्पादने.
■ पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स,
ज्वारी, गहू, मिरची, धना, जिरे, गूळ, हळद.
■ पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य
इत्यादी.
■ कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे
इत्यादी.
■ राईस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.
■ बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट,नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चुरमुरे.
Posts Carousel
Latest News
आ.पवार यांनी श्रीमती हेमलता निकम यांच्या चहा व्यवसायाला दिली भेट…
आमदार रोहित दादा पवार यांनी खर्डा येथील कै. बाळू निकम यांच्या मुलीच्या शिक्षणाची फी भरून दिला मदतीचा हात.. आ.पवार यांनी श्रीमती हेमलता निकम यांच्या चहा...
कांदा उत्पादक शेतकयांसाठी आमदार प्रा राम शिंदे साहेब आग्रही पणन मंत्री ना अब्दुल सत्तार यांची बाजार समिती संचालका सह मंत्रालयात घेतली भेट
कांदा उत्पादक शेतकयांसाठी आमदार प्रा राम शिंदे साहेब आग्रही पणन मंत्री ना अब्दुल सत्तार यांची बाजार समिती संचालका सह मंत्रालयात घेतली भेट जामखेड प्रतिनिधी, आज...
शेतकरी,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्यावतीने केलेल्या आमरण उपोषणाला यश; महावितरणकडून सर्व मागण्या मान्य*
*शेतकरी,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्यावतीने केलेल्या आमरण उपोषणाला यश; महावितरणकडून सर्व मागण्या मान्य* *राजकीय दबावापोटी उद्घटनानंतरही सुरू न झालेले घुमरी सबस्टेशनदेखील अखेर सुरू; शेतकऱ्यांना होणार...
सौताडा घाटाच्या पायथ्याशी सिमेंटचा ट्रक पलटी होऊन एकजण जबर जखमी
*सौताडा घाटाच्या पायथ्याशी सिमेंटचा ट्रक पलटी होऊन एकजण जबर जखमी* जामखेड प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली जखमीला मदत जामखेड जवळून सौताडा घाटाच्या पायथ्याशी...
तहानलेल्या कर्जत जामखेड तालुक्यातील नागरिकांना आ. रोहित पवार यांनी सुरू केलेल्या खासगी पाण्याच्या ३५ हून अधिक टँकरचा आधार*
*तहानलेल्या कर्जत जामखेड तालुक्यातील नागरिकांना आ. रोहित पवार यांनी सुरू केलेल्या खासगी पाण्याच्या ३५ हून अधिक टँकरचा आधार* *आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे वारंवार पाठपुरावा...