जामखेड प्रतिनिधी

जामखेड बाजार समिती निवडणुकीसाठी दोन दिवसापुर्वी आ. प्रा राम शिंदे व प्रा. सचिन सर गायवळ यांच्यात झालेल्या प्रदिर्घ चर्चेनंतर प्रा. गायवळ यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आ. प्रा राम शिंदे यांना पाठींबा जाहीर केला असून तालुक्यातील मोठ्या संख्येने असलेल्या आपल्या समर्थकांसोबत झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

जामखेड तालुक्यातील समर्थकांसोबत झालेल्या चर्चेत सर्वानुमते भारतीय जनता पार्टिच्या विचारधारेसोबत स्वभिमानाचं आणि सन्मानाचं राजकारण करण्यासाठी आ प्रा राम शिंदे साहेबांसोबत काम करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थित समर्थकांमध्ये तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हा चेअरमन, सोसायटी संचालक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

 

प्रा. सचिन सर गायवळ यांच्या समर्थकांमध्ये सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे तालुक्यात त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. आणि आज सगळ्याच समर्थकांनी प्रा सचिन सर गायवळ यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांचीही चिंता वाढणार आहे. प्रा सचिन सर गायवळ यांच्या पाठींब्याने जामखेड तालुक्यात भारतीय जनता पार्टिची ताकद वाढणार असुन बाजार समिती निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होणार आहे.


प्रा. सचिन सर गायवळ यांच्या भुमिकेने जामखेड तालुक्यातील अनेक स्थानिक नेत्यांचा आमच्या शिवाय तालुक्याचं राजकारण आणि निवडणुका होत नाहीत हा भ्रम संपणार आहे.

प्रा. सचिन सर गायवळ यांच्या प्राध्यापक, समाजसेवक आणि आता राजकारण या प्रवासाने राजकीय क्षेत्रातील युवा वर्गाला आ. राम शिंदे यांच्या बरोबरच हक्काच दुसरं स्थानिक नेतृत्व मिळणार आहे. आज झालेल्या बैठकीत प्रा. सचिन सर गायवळ यांच्याकडुन सर्व समर्थकांना एकविचाराने एकत्र येऊन भविष्यात स्वभिमानाचं, सन्मानाची, आणि समाजहिताचं राजकारण करण्याचं सांगण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *