आर डी गृप हा शेतकरी ग्रामविकास आघाडी बरोबरच – पांडुरंग वाळके

विरोधकांना पराभव दिसू लागल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.

जवळा प्रतिनिधी,

विरोधकांकडून असे भासवले जात होते की, आर डी गृप आमच्या बरोबर आहे परंतु यात काहीही तथ्य नाही कारण संपूर्ण आर डी गृप शेतकरी ग्रामविकास आघाडी बरोबरच आहे यात तिळमाळ शंका नाही असे गृपचे प्रमुख पांडुरंग वाळके यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सांगितले की, विरोधकांनी गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायत मार्फत कोणतेही प्रचारादरम्यान सांगण्यासारखे काम नाही त्यामुळे आता निवडणुकीला सामोरे जात असताना मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करणे, आर डी गृपचे सहकारी आमच्या समवेत आहेत असे भासवण्याचा केविलवाणा प्रकार विरोधकांकडून होत आहे. पंरतु आर डी गृप हा पुर्णतः शेतकरी ग्रामविकास आघाडी बरोबरच आहे त्यामुळे जवळा गावातील सुज्ञ मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

लोकनेते स्व. श्रीरंगभाऊ कोल्हे, स्व किसनराव दळवी व स्व. प्रदिप (आबा) पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन या पॅनेलने तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. शेतकरी ग्रामविकास आघाडी मार्गदर्शक म्हणून दत्तात्रय कोल्हे, प्रदिप दळवी, राजू महाजन, आर. डी. पवार, आजीनाथ हजारे, डॉ. पवार, दिपक पाटील, राजू राऊत, शहाजी पाटील पवार, राजू मोटे, पांडुरंग वाळके, आयुब शेख, हुसेन सय्यद, सत्तार भाऊसाहेब यांच्या सह अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ काम करत आहेत. यामुळे शेतकरी ग्रामविकास आघाडी हा सर्व समावेश पॅनल असून यातील सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार असून जवळा गावचा सर्वागीण विकास करणार आहेत असा विश्वास पांडुरंग वाळके यांनी बोलताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *