भाजपाचा पक्षांतर्गत नाराजीचे सुर थंडावले असले तरी घटक पक्ष आणि स्थानिक नेत्यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह कायम?

जामखेड प्रतिनिधी,
भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार मा,सुजय विखे, आमदार प्रा राम शिंदेसाहेब आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पक्षांतर्गत मतभेद मिटले असले तरी,महायुतीतील घटकपक्ष आणि काही स्थानिक नेत्यांची भुमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट)यांच्याकडुन अजुनही तालुकाध्यक्ष पदाची निवड झालेली नसल्यामुळे मतदारसंघात पक्षाचं नेतृत्व कोण करणारं हे अद्याप स्पष्ट झाले नाही, शिवसेना (मा,एकनाथ शिंदे गट) यांचही मतदार संघात काही प्रमाणात अस्तित्व आहे त्यांची भुमिकाही आजपर्यंत स्पष्ट झालेली नाही.


जामखेड तालुक्यातील मातब्बर स्थानिक नेते प्रा सचिन सर गायवळ यांना मानणारा मोठा गट जामखेड तालक्यात सक्रिय आहे, मध्यंतरीच्या काळात झालेली मार्केट कमिटी निवडणुक आणि महीनाभरापुर्वी झालेल्या अहमदनगर जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पार्टीला सहकार्य करत महत्वाची भुमिका पार पाडत खरेदी विक्री संघात भाजपा उमेदवाराचा निसटता पराभव झाला असला तरी जामखेड मार्केट कमिटी निवडणुकीत मात्र त्यांच्या सहकार्याने भाजपाला विजय मिळवता आला होता

महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्हीही निवडणुकीत जामखेड तालुक्यातील विखे गट स्थानिक भाजपा उमेदवारांच्या विरोधात काम करत असल्याच्या चर्चा होत होत्या, त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत प्रा सचिन सर गायवळ आणि त्यांचे समर्थक काय भुमिका घेणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे
भाजपाचे अंतर्गत मतभेद आणि मनभेद जरी मिटले असले तरी भाजपा चे लोकसभेचे उमेदवार मा,सुजय विखे पाटील यांना महायुतीचे घटक पक्ष आणि स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनचं पुढची रणनिती तयार करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *