रत्नदिप कॉलेजची मान्यता रद्द होणार? कुलगुरू बरोबर विद्यार्थी व पांडुरंग भोसले यांची बैठक संपन्न

रत्नदिप कॉलेजची मान्यता रद्द होणार? कुलगुरू बरोबर विद्यार्थी व पांडुरंग भोसले यांची बैठक संपन्न

जामखेड प्रतिनिधी-

रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या BHMS या वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष पांडूराजे भोसले यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरू माधुरी कानेटकर यांच्या बरोबर काल दि ३ एप्रिल रोजी दुपारी ११:०० वाजता विद्यापीठाच्या सभागृहात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

रत्नदीप मेडिकल कॉलेजचा अध्यक्ष भास्कर मोरे याने तेथे शिकत असलेल्या हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनींची अनेक दिवसांपासून शारीरिक अर्थिक व मानसीक पिळवणूक केली आहे . या विरोधात उद्विग्न झालेल्या विद्यार्थी , ग्रामस्थ , सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष , सामाजिक कार्यकर्ते यांनी सलग ११ दिवसांचे आंदोलनं केले होते तर श्रीशिवप्रतिष्ठानचे पांडूराजे भोसले यांनी १० दिवस आमरण उपोषण केले होते. या सर्व विद्यार्थ्याना यथोचित न्याय देण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकारी तथा जामखेडचे तहसिलदार व सर्व विद्यापीठांनी दिले होते.

दरम्यान या कॉलेज मध्ये BHMS या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला व या सर्व विद्यार्थ्याना आर्थिक उद्देशाने भास्कर मोरे याने प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेत नापास केल्याचे समोर आले. या बाबत सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व संघटनांनी मा. कुलगुरू आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांना निवेदन देऊन हा अन्याय दूर करण्याचा विनंती केली होती

त्या संदर्भात दि ३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ११:०० वाजता आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी विद्यापीठाच्या सभागृहात महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती या बैठकीला विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानेटकर मॅडम , रत्नदिपचे BHMS चे सर्व विद्यार्थी व श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष पांडूराजे भोसले उपस्थित होते.

या वेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मा. कुलगुरू माधुरी कानेटकर मॅडम यांच्या समोर भास्कर मोरेच्या छळछावणीचे वास्तव मांडले तर पांडूराजे भोसले यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्या बैठकी दरम्यान ठरल्या प्रमाणे विद्यापीठाची फसवणुक केल्या प्रकरणी विद्यापीठाने भास्कर मोरे वर गून्हे दाखल करण्याची मागणी केली.

तसेच लवकरात लवकर या सर्व विद्यार्थ्याना इतर चांगल्या कॉलेज मध्ये शिक्षण उपलब्ध करून द्यावे व रत्नदीप मेडिकल कॉलेजची मान्यता कायमस्वरूपी रद्द करून हे कॉलेज बंद करण्याची मागणी केली व तसे निवेदन मा . कुलगुरू माधुरी कानेटकर मॅडम यांना देण्यात आले.

सर्वाची मते ऐकूण घेतल्या नंतर मा . कुलगुरू यांनी सर्व विद्यार्थी लवकरच इतर चांगल्या कॉलेज मध्ये जातील व रत्नदिप कॉलेजची मान्यता रद्द करण्यात येईल असे आश्वासन दीले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page