प्रशासनाकडुन दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नऊ दिवसांपासून सुरू आसलेले पांडुराजे भोसले यांचे उपोषणास मागे

अंदोलक विद्यार्थ्यांच्या हस्ते लिंबु पाणी घेऊन सोडले अमरण उपोषण

जामखेड प्रतिनिधी,

रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विरोधात गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांचे उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र यावेळी लेखी आश्वासन देऊनही जर योग्य ती कार्यवाही न झाल्यास पुन्हा उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा ईशारा पांडुराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.

रत्नदिप मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या मानसिक, शाररीक व अर्थिक त्रासामुळे गेली नऊ दिवस अमरण उपोषणाला श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष पांडुराजे भोसले सह विद्यार्थी विद्यार्थीनी तहसील कार्यालया समोर उपोषणास बसले होते. रत्नदीप मेडिकल कॉलेजची मान्यता कायमस्वरूपी रद्द व्हावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता इतर कॉलेजमध्ये ट्रानस्पर करावे.

या मागण्या संदर्भात यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, मुंबई नर्सिंग, एम.एस. बि.टी. या विद्यापीठाचे अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व त्याचे ट्रान्सफर इतर महाविद्यालयामध्ये करणेसाठी कोणताही अडथळा येणार नाही व लवकरात लवकर ट्रान्सफर ची प्रकिया राबविण्याबाबत कामकाज सुरु असल्याचे तंत्र शिक्षण संचालनालय विभागाचे यासंदर्भातील पत्र देण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे प्रॅक्टीकल व सेक्शनलचे पेपर आठ तारखेपासून इतर कॉलेजमध्ये घेण्यात येणार आहेत असे आश्वासित केले. विद्यापिठ प्रशासनाने वरील बाबीचा गांभीर्याने विचारुन करुन मुलांचे ट्रान्स्फर करावे व शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे पांडुराजे भोसले यांनी विद्यापीठास अवगत केले.

तसेच रत्नदिप कॉलेज मध्ये दोन हरीण पाळण्यात आलेले होते व एका हरणाचे अवशेष खोदकामात आढळून आले होते त्यामधील एक हरीण जखमी अवस्थेत सापडले होते व दुसरे हारणाचे काय झाले हा प्रश्न ऊदभवला होता तसेच कॉलेजच्या लॅबमध्ये हरणाची विष्ठा व घास हे आढळले होते. यावर वन विभागाने गुन्हा दाखल केला होता तरी या गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी चुकीचा तपास केला आहे. एकाच व्हिडिओ मध्ये असलेले दोन हरिण त्यातील एका हरणाचा अजुनही तपास अपुराच आहे यासंदर्भात चौकशी समिती नेमावी व सर्व तपास पुन्हा करावा आणि दुसरे जिवंत हरीण पुन्हा तपासात उघड करावे असे वनाधिकारी सुवर्णा माने यांना निवेदन देण्यात आले.

जामखेड तालुक्याचे आमदार रोहीत दादा पवार व आमदार राम शिंदे या दोन्ही प्रतिनीधींनी सभागृहात रत्नदिप कॉलेजचा विषय घेऊन लक्षवेधी लाऊन या विषया कडे संबंधित मंत्र्याचे लक्ष वेधले यावर संबंधित मंत्री मोहदयांनी सुध्दा संबंधीत कॉलेजची सखोल चौकशी करून कॉलेजची मान्यता रद्द करण्यात येईल व एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही असे आश्वासन दिले.

सदरील अमरण उपोषण हे ९ दिवस चालले उपोषण सोडते वेळी पांडुराजे भोसले यांच्या सर्व मागण्या संदर्भात तहसीलदार गणेश माळी व सुवर्णा माने वन अधिकारी अ. नगर यांनी लेखी आश्वासन पत्र देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वस्त केले व उपोषण थांबवण्याची विनंती केली.

यावेळी लेखी आश्वासन देऊन जर योग्य ती कार्यवाही न झाल्यास पुन्हा उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा ईशारा पांडुराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला व त्यानंतर मी उपोषण सोडत नाही काही दिवसांसाठी स्थगित करत आहे असे घोषित करून उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष श्री पांडुराजे भोसले यांनी विद्यार्थिनींच्या हातुन उपोषण सोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *