*कोण बनेगा करोडपती मध्ये मराठवाड्यातील युवक किशोर आहेर*

जामखेड प्रतिनिधी,

सोनी वाहिनी वरील सर्वात मोठा शो कोण बनेगा करोडपती चा 2 ऑक्टोबर 2024 चा 25 लाखा चा विजेता किशोर आहेर याचा सन्मान सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी, जामखेड येथे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांचे हस्ते करण्यात आला.डॉ संजय भोरे यांचा किशोर आहेर हा खूप जवळचा नातेवाईक आहे.

यावेळी  संचालक तेजस भोरे,यशराज भोरे,प्राचार्या अस्मिता जोगदंड ( भोरे ),सचिन भोरे,प्रा. विनोद बहिर सर, दादासाहेब मोहिते सर, प्रदिप भोंडवे सर, छबीलाल गावित, सुनील घाडगे, विवेक सातपुते, सागर कदम,स्वाती पवार,चंद्रकांत सातपुते, सुषमा भोरे, साधना दंडवते, सविता काळे, अमर भैसडे, बिभीषण भोरे, सुरज वाघमारे, जयश्री कदम, हर्षा पवार,वैष्णवी तनपुरे,सानिया सय्यद,जयश्री सप्ते,महेश पाटील,दिनकर सरगर,हनुमंत वाघमारे, बुवासाहेब दहिकर, दीपक दहिकर हे उपस्थित होते.

किशोर आहेर हा तसा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खळेगाव या खेडेगावातील तरुण आहे तो मेकॅनिकल इंजिनीअर आहे, तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे…

किशोर आहेर तो सध्या खाजगी जॉब करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता परंतु हुशार आणि जिज्ञासू म्हणून त्याची ओळख होती आपल्या हुशारीच्या बळावर त्याच सिलेक्शन कोण बनेगा करोडपती मध्ये झाले व जवळ जवळ त्याने 12  प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देऊन 25 लाख रुपये जिंकले ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.

यावेळी बोलताना आहेर म्हणाला, विध्यार्थ्यांना आपण के बी शी च्या कार्यक्रमात कसे पोहचलो व अमिताभ बच्चन बरोबर सेट वर चा अनुभव सांगितला तसेच स्पर्धा परीक्षा बाबत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले केले. जिदद चिकाटी आणि अभ्यासातील सातत्या आपल्याला यशाच्या शिखरावर जाण्यापासून रोखू शकत नाही हे सतत आपण लक्षात ठेवलं पाहिजे उद्या तुम्ही सुद्धा अधिकारी होऊ शकता कोणी कोण बनेगा करोडपती मध्ये जाऊ शकत फक्त जिद्ध आणि ध्येय ठेवा काहीच अवघड नाही असे मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *